एकनाथ शिंदेंना भाजपपासून दूर राहण्याचा रोहित पवारांचा सल्ला
राज्याच्या राजकारणात सध्या घडामोडीना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता रोच संघर्ष पाहायला मिळत आहे. अश्यातच राष्ट्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोन्ही पक्षांचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. (Rohit Pawar)
रोहित पवारांनी एकनाथ शिंदेंना विनंती करत जास्त काळ भाजपसोबत राहू नका असा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीकादेखील केली. आधीच महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यात रोहित पवारांच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे, राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
“भाजपसोबत सत्तेत राहणाऱ्या पक्षांचं राजकीय नुकसान होऊ शकतं,” असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलं. एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षपणे भाजपसोबत जास्त काळ राहू नका, अशी विनंतीही त्यांनी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटावरदेखील टोला लगावला. “आपल्या कुटुंबातील दुसऱ्या पक्षात नेमकं काय सुरू आहे, हे त्यांनाच माहीत नाही,” असं ते म्हणाले.
राष्ट्रवादीत खदखद नेमकी आहे तरी कसली? पक्षाचे नेतेमंडळी झाले सैरभैर
AI डेटा सेंटरच्या मुद्द्यावरूनही रोहित पवारांनी सरकारला लक्ष्य केलं. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनाच AI डेटा सेंटरबद्दल माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला. 100 पवार आले तरीही डेटा सेंटर होईल, या वक्तव्याला उत्तर देताना ‘100 कशाला, एकटाच पवार तुम्हाला बस आहे,’ असा टोला त्यांनी लगावला. या प्रकल्पात स्थानिक आमदारांच्या निकटवर्तीयांची भागीदारी असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारची कर्जमाफी योजना नसून ती कर्जवसुली योजना असल्याची टीका रोहित पवारांनी केली. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं अद्याप पूर्ण झालेली नाहीत, असं सांगत हिवाळी अधिवेशनापर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला.
मायक्रो फायनान्स कंपन्यांची वसुली किमान एक वर्ष थांबवावी आणि त्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
यंदाची दुष्काळी परिस्थिती 1972 पेक्षाही वाईट असल्याचं रोहित पवार म्हणाले. शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांची अवस्था पाहून मन हेलावून जात असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारने तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात आणि पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.
एकूणच शेतकरी प्रश्न, AI डेटा सेंटर आणि सत्ताधाऱ्यांच्या राजकारणावरून रोहित पवारांनी सरकारला चांगलंच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
Ans: भाजपसोबत सत्तेत राहणाऱ्या पक्षांचं नुकसान होणार असल्याचं सांगत रोहित पवारांनी सरकारवर संविधान, शेतकरी प्रश्न आणि AI डेटा सेंटरच्या मुद्द्यावरून टीका केली.
Ans: हिवाळी अधिवेशनापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांची वसुली एक वर्ष थांबवण्याची मागणीही केली.
Ans: एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत जास्त काळ राहू नये, अशी अप्रत्यक्ष विनंती केल्याचं रोहित पवारांनी सांगितलं.






