Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी भाषा अभिजात दर्जा: मला आनंद महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यात माझे योगदान-पंतप्रधान नरेंद्र मोदी

3 ऑक्टोबर 2024 ला मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिजात मराठी सन्मान सोहळा कार्यक्रमामध्ये मराठी भाषेच्या इतिहासाचा परंपरेचा आणि योगदानाचा गौरव केला.

  • By नारायण परब
Updated On: Oct 05, 2024 | 10:09 PM
फोटो सौजन्य- Youtube

फोटो सौजन्य- Youtube

Follow Us
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीआज महाराष्ट्र राज्य सरकारने अभिजात मराठी सन्मान सोहळा कार्यक्रमाला उपस्थित राहत त्यांनी सुरुवातीला मराठीतून संवाद साधला. नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल सर्व मराठी भाषिकांचे अभिनंदन केले आणि ते म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त त्यांना दिलेला मानाचा मुजरा आहे. नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्राच्या लोकांना दशकांपासून वाट पहात होते. मला आनंद होत आहे की महाराष्ट्राचे हे स्वप्न पूर्ण करण्यात माझे काही योगदान मला देता आले. मराठी भाषेचा इतिहास खूप समृध्द आहे. या भाषेतून ज्ञानाचा झरा वाहिला त्यामुळे अनेक पिढींचे मार्गदर्शन झाले आहे. आजही आपल्याला मार्ग दाखवत आहे.

संतांचा गौरव

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतूनच वेदांन्त चर्चेला जनमानसाशी जोडले. ज्ञानेश्वरीने गीताच्या ज्ञानाशी भारताच्या आध्यात्मिक प्रज्ञेला पुनर्जागृत केले. संत नामदेव यांनी भक्तीमार्गाच्या चेतनेला मजबूत केले. संत तुकाराम यांनी मराठी भाषेतूनच धार्मिक जागृकतेचे अभियान चालविले आणि संत चोखामेळाने सामाजिक परिवर्तनाच्या आंदोलनाला सशक्त केले. आज महाराष्ट्र आणि मराठी धर्म वाढविणाऱ्या थोर संतांस मी साष्टांग दंडवत करतो.

मराठी भाषेचे योगदान

मोदी पुढे म्हणाले,  भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास मराठी भाषेच्या योगदानाने समृध्द होतो. लोकमान्य टिळकांनी केसरी च्या माध्यमातून परदेशी सत्तेची मुळे हलवली होती. मराठीमध्ये दिलेल्या अनेक भाषणांनी जनमानसात स्वराज्य मिळविण्याची इच्छा जागृत केली होती. गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक वृत्तपत्राद्वारे सामाजिक सुधारणांच्या अभियानाला घरोघरी पोहचविले. महाराष्ट्रात मराठी साहित्याद्वाराच स्वराज्य, स्वदेशी, स्वभाषा आणि स्वसंस्कृतीच्या चेतनेचा विस्तार झाला.

महाराष्ट्रातील सामाजिक चळवळ ते औद्योगिक मराठी भाषेचे योगदान आणि भाषेचे विविध पैलूविषयी पंतप्रधान मोदीं यांनी भाषणात उल्लेख केला. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि विविध क्षेत्रातील नामवंत  व्यक्ती आदी उपस्थित होते.

Web Title: Marathi language elite status prime minister narendra modi said that i am happy my contribution in fulfilling the dream of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 09:59 PM

Topics:  

  • narendra modi

संबंधित बातम्या

PM Narendra Modi: ‘पेपर लीक करणाऱ्यांना अशी शिक्षा द्या…’ दिल्लीतील आंदोलनानंतर पंतप्रधान मोदींची मोठी भूमिका
1

PM Narendra Modi: ‘पेपर लीक करणाऱ्यांना अशी शिक्षा द्या…’ दिल्लीतील आंदोलनानंतर पंतप्रधान मोदींची मोठी भूमिका

Modi Must Resign: आता धर्मेद्र प्रधानांचा नाही थेट नरेंद्र मोदींचा राजीनामा..! जंतर-मंतरवरील राड्यानंतर अभिजीतचा आक्रमक पवित्रा
2

Modi Must Resign: आता धर्मेद्र प्रधानांचा नाही थेट नरेंद्र मोदींचा राजीनामा..! जंतर-मंतरवरील राड्यानंतर अभिजीतचा आक्रमक पवित्रा

‘राहुल गांधी नव्हे, मोदींनी वांगचुक यांची भेट का घेतली नाही?’ हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल
3

‘राहुल गांधी नव्हे, मोदींनी वांगचुक यांची भेट का घेतली नाही?’ हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल

पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन ट्रेनचे उद्घाटन! अवघ्या 5 रुपयांत जींद ते सोनीपत प्रवास, प्लॅटफॉर्म तिकिटापेक्षाही स्वस्त भाडे
4

पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन ट्रेनचे उद्घाटन! अवघ्या 5 रुपयांत जींद ते सोनीपत प्रवास, प्लॅटफॉर्म तिकिटापेक्षाही स्वस्त भाडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.