Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली ते पाटणा हायस्पीड ट्रेन लवकरच धावणार; 1170 किमीचा प्रवास साडेचार तासांत होणार पूर्ण

सध्या रेल्वेने हे अंतर कापण्यासाठी सुमारे १२ तास लागतात. रेल्वेमंत्र्यांनी नेपाळगंज रोड-नानपारा-बहराइच मार्गावरील नव्याने विद्युतीकरण झालेल्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाच्या उद्घाटनावेळी प्रस्तावित हायस्पीड रेल्वे नेटवर्कचा उल्लेख केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 04, 2026 | 09:42 AM
दिल्ली ते पाटणा हायस्पीड ट्रेन लवकरच धावणार; 1170 किमीचा प्रवास साडेचार तासांत होणार पूर्ण

दिल्ली ते पाटणा हायस्पीड ट्रेन लवकरच धावणार; 1170 किमीचा प्रवास साडेचार तासांत होणार पूर्ण

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पातील मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉरचा पहिला टप्पा पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील प्रस्तावित हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या कॉरिडॉरमुळे दिल्लीपासून उत्तर प्रदेश आणि बिहारमधील प्रमुख शहरांची कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान होणार असून, दिल्ली-पाटणा हे सुमारे ११७० किलोमीटरचे अंतर अवघ्या साडेचार तासांत पार करता येणार आहे.

सध्या रेल्वेने हे अंतर कापण्यासाठी सुमारे १२ तास लागतात. रेल्वेमंत्र्यांनी नेपाळगंज रोड-नानपारा-बहराइच मार्गावरील नव्याने विद्युतीकरण झालेल्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाच्या उद्घाटनावेळी प्रस्तावित हायस्पीड रेल्वे नेटवर्कचा उल्लेख केला. मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉरनंतर दिल्लीला आग्रा, कानपूर, लखनौ, प्रयागराज, वाराणसी आणि पाटणा या शहरांना जोडणाऱ्या हायस्पीड रेल्वे नेटवर्कच्या कामाला वेग दिला जाईल.

भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; 10 सप्टेंबरपासून ‘या’ मार्गावर 36 दिवसांचा असणार ब्लॉक, अनेक गाड्या होणार रद्द

प्रस्तावित हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची रचना ताशी ३२० किलोमीटरपर्यंतच्या परिचालन वेगासाठी केली जात आहे. त्या तुलनेत वंदेभारत रेल्वेची डिझाइन स्पीड ताशी सुमारे १८० किलोमीटर आहे. हायस्पीड रेल्वेच्या अधिक वेगामुळे दिल्ली ते बिहार या लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होण्याची अपेक्षा आहे.

अनेक प्रीमियम रेल्वे सेवा सुरू

सध्या या मार्गावर राजधानी, वंदे भारत आणि दुरंतो यांसारख्या प्रीमियम रेल्वे सेवा सुरू आहेत. हायस्पीड कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर दिल्ली आणि उत्तर प्रदेश-बिहारमधील प्रमुख शहरांदरम्यानचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

अनेक शहरांचा प्रवासाचा वेळ वाचणार

प्रस्तावित कॉरिडॉरअंतर्गत दिल्ली ते आग्रा हे सुमारे २०० किलोमीटरचे अंतर केवळ ५८ मिनिटांत पार करता येणार आहे. दिल्ली-कानपूरमधील सुमारे ४५५ किलोमीटरचा प्रवास सुमारे १ तास ५० मिनिटांत; तर दिल्ली-लखनौमधील सुमारे ४९५ किलोमीटरचे अंतर २ तास १२ मिनिटांत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे दिल्ली ते प्रयागराज हे सुमारे ७५० किलोमीटरचे अंतर ३ तासांत, दिल्ली-वाराणसीचे सुमारे ९४५ किलोमीटर अंतर ३ तास ३३ मिनिटांत, तर दिल्ली-पाटणा हे सुमारे १,१७० किलोमीटरचे अंतर साडेचार तासांत पार करता येणार आहे.

Web Title: High speed train between delhi and patna to run soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • Bullet Train
  • High Speed Train
  • narendra modi

संबंधित बातम्या

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?
1

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?

Mumbai News: दहिसरच्या सावरपाड्यात 26 वे ‘सुविधा केंद्र’; पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन, 24 तास मिळणार सुविधा
2

Mumbai News: दहिसरच्या सावरपाड्यात 26 वे ‘सुविधा केंद्र’; पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन, 24 तास मिळणार सुविधा

Amit Thackeray: पुण्यात अमित ठाकरेंच्या दौऱ्यात राड्याची ठिणगी? सरकारी महाविद्यालयातून मोदींचा फोटो हटवला, VIDEO व्हायरल
3

Amit Thackeray: पुण्यात अमित ठाकरेंच्या दौऱ्यात राड्याची ठिणगी? सरकारी महाविद्यालयातून मोदींचा फोटो हटवला, VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.