Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: दहिसरच्या सावरपाड्यात 26 वे ‘सुविधा केंद्र’; पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन, 24 तास मिळणार सुविधा

Mumbai News: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री तथा उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी दहिसर पूर्वेतील सावरपाडा येथे मुंबईतील 26 व्या ‘सुविधा केंद्रा’चे उद्घाटन केले. या केंद्रात स्वच्छ शौचालये, आंघोळ, लॉन्ड्री आणि आरओ-फिल्टर पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 31, 2026 | 03:05 PM
दहिसरच्या सावरपाड्यात 26 वे ‘सुविधा केंद्र’; पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन, 24 तास मिळणार सुविधा

दहिसरच्या सावरपाड्यात 26 वे ‘सुविधा केंद्र’; पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन, 24 तास मिळणार सुविधा

Follow Us
Follow Us:
  • स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी ते लॉन्ड्री एकाच ठिकाणी
  • उत्तर मुंबईत 100 ‘सुविधा केंद्रे’ उभारण्याची तयारी
  • 150 रुपयांत महिनाभर अमर्यादित स्वच्छतागृह वापराची सुविधा
Mumbai News: उत्तर मुंबईतील नागरिकांना स्वच्छ आणि आधुनिक सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दहिसर पूर्वेतील सावरपाडा येथे नवीन ‘सुविधा केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री तथा उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी या केंद्राचे व्हर्च्युअल माध्यमातून उद्घाटन केले. हे मुंबईतील 26 वे सुविधा केंद्र असल्याचे गोयल यांनी यावेळी सांगितले. या केंद्रात नागरिकांना स्वच्छ शौचालय, आंघोळ, कपडे धुण्याची सुविधा आणि शुद्ध पिण्याचे पाणी एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे हे सुविधा केंद्र 24 तास सुरू राहणार आहे.

29 टॉयलेट सीट, 6 लॉन्ड्री मशीन

सावरपाडा येथील सुविधा केंद्रात एकूण 29 टॉयलेट सीट आणि सहा लॉन्ड्री मशीन बसवण्यात आल्या आहेत. यासोबतच पाणी शुद्धीकरणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. पाच सदस्यांच्या कुटुंबाला दरमहा 150 रुपयांत अमर्यादित शौचालय वापरता येणार आहे. आरओ-फिल्टर केलेले पिण्याचे पाणी एक रुपया प्रतिलिटर दराने उपलब्ध होईल. सात किलो कपडे धुण्यासाठी 70 रुपये आकारण्यात येणार आहेत. उपलब्ध माहितीनुसार, अशा प्रकारचे प्रत्येक सुविधा केंद्र साधारण नऊ महिन्यांत संचालनाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होऊ शकते.

Samruddhi Mahamarg: अपघात अन् लुटमारीच्या घटनांनी प्रवास धोकादायक; अत्याधुनिक रुग्णालय आणि स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी

CSR निधीतून PPP मॉडेलवर उभारणी

सावरपाड्यातील हे केंद्र कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीच्या माध्यमातून सार्वजनिक-खासगी भागीदारी अर्थात PPP मॉडेलवर उभारण्यात आले आहे. या उपक्रमात हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, HSBC इंडिया, JSW फाउंडेशन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका सहभागी आहेत.

पर्यावरणपूरक सुविधांवर भर

या सुविधा केंद्राच्या बांधकामात शाश्वत डिझाइनवरही भर देण्यात आला आहे. ग्रीन स्टील आणि ग्रीन सिमेंटचा वापर करण्यात आला असून छतावर सौरऊर्जा यंत्रणा आणि ग्रेवॉटर रिसायकलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीचा विचार करून केंद्राची रचना करण्यात आली आहे. पुरापासून संरक्षणासाठी हे केंद्र जमिनीपासून तीन फूट उंचीवर बांधण्यात आले आहे.

‘गरज भासल्यास 100 सुविधा केंद्रे उभारू’

उत्तर मुंबईतील प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ शौचालय, पिण्याचे पाणी, आंघोळ आणि लॉन्ड्रीसारख्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, असे पीयूष गोयल यांनी सांगितले. त्यासाठी आवश्यकता भासल्यास उत्तर मुंबईत अशा प्रकारची 100 सुविधा केंद्रे उभारण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी उत्तर मुंबईत सुरू करण्यात आलेल्या एका सुविधा केंद्राचा दररोज 1,500 पेक्षा अधिक नागरिक वापर करत असल्याचेही त्यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांकडून त्याचे व्यवस्थापन केले जात असून महिला स्वयं-सहायता गटांची त्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे.

महिलांकडे व्यवस्थापनाची जबाबदारी

नवीन सुविधा केंद्राच्या व्यवस्थापनातही महिलांचा सहभाग वाढवण्यावर गोयल यांनी भर दिला. महिलांनी हे केंद्र चालवावे आणि आपल्या घराप्रमाणे त्याची स्वच्छता व देखभाल करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

युवकांना स्वच्छतेसाठी टीम बनवण्याचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातील पटवाई गावाच्या उदाहरणाचाही गोयल यांनी उल्लेख केला. तेथील युवकांनी एकत्र येऊन परिसर आणि जलस्रोतांच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतल्याचे सांगत उत्तर मुंबईतील युवकांनीही आपल्या भागात स्वच्छतेसाठी टीम तयार कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. उत्तर मुंबईतील नऊ तलावांच्या स्वच्छतेचे काम सुरू असून, त्यापैकी एका तलावाची स्वच्छता आणि सुशोभीकरण पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी दिली. पुढील तलावाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सावरपाड्यात सुरू झालेले हे केंद्र केवळ सार्वजनिक स्वच्छतागृहापुरते मर्यादित नसून स्वच्छता, पाणी, आंघोळ आणि कपडे धुण्याच्या मूलभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे बहुउद्देशीय जनसुविधा केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहे.

मुंबईत १० टक्के पाणी कपात असताना टँकरला पाणी मिळते कुठून? टँकर लॉबीला कोणाचा आशिर्वाद? अतुल लोंढेंचा सवाल

Web Title: Piyush goyal inaugurates 26th suvidha centre at savarpada dahisar north mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Mumbai
  • narendra modi
  • Piyush Goyal

संबंधित बातम्या

Ferry Boat : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू
1

Ferry Boat : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू

Amit Thackeray: पुण्यात अमित ठाकरेंच्या दौऱ्यात राड्याची ठिणगी? सरकारी महाविद्यालयातून मोदींचा फोटो हटवला, VIDEO व्हायरल
2

Amit Thackeray: पुण्यात अमित ठाकरेंच्या दौऱ्यात राड्याची ठिणगी? सरकारी महाविद्यालयातून मोदींचा फोटो हटवला, VIDEO व्हायरल

Samruddhi Mahamarg: अपघात अन् लुटमारीच्या घटनांनी प्रवास धोकादायक; अत्याधुनिक रुग्णालय आणि स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी
3

Samruddhi Mahamarg: अपघात अन् लुटमारीच्या घटनांनी प्रवास धोकादायक; अत्याधुनिक रुग्णालय आणि स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी

‘मी मेलो तरी माझं मढं मुंबईला घेऊन जा’, ‘१२ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा…’ मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम
4

‘मी मेलो तरी माझं मढं मुंबईला घेऊन जा’, ‘१२ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा…’ मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.