Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समुद्रात ‘मरीन नेव्हिगेशन बॉईज’ची सोय!ओहोटी रेषेच्या चिन्हांकनासाठी पालिकेचा २.७७ कोटींचा प्रस्ताव

दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि माधी गणेशोत्सव या तीनही प्रमुख सणांच्या काळात ही व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येईल आणि विसर्जन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती सुरक्षितपणे काढून जतन करून ठेवली जाईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 18, 2026 | 08:52 AM
समुद्रात 'मरीन नेव्हिगेशन बॉईज'ची सोय!ओहोटी रेषेच्या चिन्हांकनासाठी पालिकेचा २.७७ कोटींचा प्रस्ताव

समुद्रात 'मरीन नेव्हिगेशन बॉईज'ची सोय!ओहोटी रेषेच्या चिन्हांकनासाठी पालिकेचा २.७७ कोटींचा प्रस्ताव

Follow Us
Follow Us:

मुंबईतील विविध सण-उत्सवांदरम्यान समुद्रात होणाऱ्या मूर्ती विसर्जनाच्या वेळी सागरी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत मुंबईतील प्रमुख २१ समुद्रकिनाऱ्यांवर ओहोटीची रेषा चिन्हांकित केली जाणार आहे. यासाठी समुद्रात मार्गदर्शक तरंगचिन्हे म्हणजेच ‘मरीन नेव्हिगेशन बॉईज’ बसवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.(फोटो सौजन्य – AI)

मादाम कामा महिला वसतिगृहातील पाणीप्रश्नावर अभाविप आक्रमक; ‘आश्वासन नको, कृती हवी’, विद्यार्थिनींच्या तक्रारींकडे दुर्लक्षाचा आरोप

पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी या कामाकरिता सुमारे २ कोटी ७७ लाख ९८ हजार ४९३ रुपयांचा खर्च अपेक्षित असलेला प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका क्र. ९६/२०१४ च्या अनुषंगाने, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार समुद्रातील मूर्ती विसर्जन हे ओहोटीची रेषा आणि भरतीची रेषा यांच्या दरम्यान असलेल्या ‘नॉन-इको सेन्सिटिव्ह’ क्षेत्रातच करणे बंधनकारक आहे. त्यानुसार पालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल खात्यामार्फत मुंबईतील २१ प्रमुख विसर्जन स्थळांवर ही तरंगचिन्हे उभारली जाणार आहेत.

प्रस्तावावर लवकरच होणार अंतिम निर्णय

रात्रीच्या वेळी विसर्जन व्यवस्थापन करणाऱ्या भूस्तरीय कर्मचाऱ्यांना ओहोटीची रेषा स्पष्टपणे दिसावी यासाठी या तरंगचिन्हांवर सौरऊर्जेवर चालणारे (सोलर) दिवे बसवले जातील. तसेच समुद्रातील लाटांमुळे ही तरंगचिन्हे वाहून जाऊ नयेत म्हणून त्यांना समुद्राच्या तळाशी दोरीने स्थिर केले जाणार आहे. दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि माधी गणेशोत्सव या तीनही प्रमुख सणांच्या काळात ही व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येईल आणि विसर्जन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती सुरक्षितपणे काढून जतन करून ठेवली जाईल.

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो

या संपूर्ण कामासाठी पालिकेने मागवलेल्या ई-निविदेत मे. लिटमस मरीन इनव्हेशन प्रा. लि. ही कंपनी पात्र ठरली असून, त्यांच्या २ कोटी ६७ लाख २९ हजार ३२० रुपयांच्या मूळ बोलीवर अधिक ४ टक्के भौतिक सादिलवार जोडून एकूण २ कोटी ७७ लाख ९८ हजार ४९३ रुपये खर्चाच्या कंत्राटाला प्रशासकीय मंजुरी देण्याची शिफारस करण्यात आली आहे. लवकरच या प्रस्तावावर अंतिम निर्णय होऊन प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू होणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘मरीन नेव्हिगेशन बॉईज’ म्हणजे काय?

    Ans: समुद्रातील ठरावीक भाग, मार्ग किंवा सीमा दर्शवण्यासाठी पाण्यावर बसवण्यात येणाऱ्या तरंगत्या चिन्हांना मरीन नेव्हिगेशन बॉईज म्हणतात. यामुळे समुद्रातील मार्गदर्शन आणि सुरक्षितता सुधारण्यास मदत होते.

  • Que: मरीन नेव्हिगेशन बॉईजचा उपयोग कशासाठी केला जाणार आहे?

    Ans: दिलेल्या माहितीनुसार, समुद्रातील ओहोटी रेषेचे चिन्हांकन करण्यासाठी या बॉईजचा वापर करण्याचा प्रस्ताव आहे.

  • Que: ओहोटी रेषेचे चिन्हांकन का महत्त्वाचे आहे?

    Ans: समुद्राची पातळी आणि किनारपट्टीतील बदल लक्षात घेऊन विशिष्ट समुद्री सीमा ओळखण्यासाठी ओहोटी रेषेचे चिन्हांकन उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे किनारपट्टी व्यवस्थापन आणि नियोजनाला मदत होऊ शकते.

Web Title: Marine navigation buoys to be installed at sea municipal corporation proposes 2 77 crore plan to mark the low tide line

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 08:52 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganpati Festival
  • Mumbai News

संबंधित बातम्या

कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान विशेष मेगाब्लॉक; ‘या’ स्थानकांदरम्यान लोकल गाड्या ठप्प
1

कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान विशेष मेगाब्लॉक; ‘या’ स्थानकांदरम्यान लोकल गाड्या ठप्प

मुंबईत घर खरेदीत झाली मोठी वाढ; सप्टेंबरमध्ये घर नोंदणीचा नोंदवला नवा उच्चांक
2

मुंबईत घर खरेदीत झाली मोठी वाढ; सप्टेंबरमध्ये घर नोंदणीचा नोंदवला नवा उच्चांक

Mumbai News: रेल्वे स्थानकातच मिळणार किराणा, झेरॉक्स! नायगाव, विरार स्थानकातील मोकळ्या जागेत व्यावसायिक कियोस्क
3

Mumbai News: रेल्वे स्थानकातच मिळणार किराणा, झेरॉक्स! नायगाव, विरार स्थानकातील मोकळ्या जागेत व्यावसायिक कियोस्क

Navi Mumbai : APMC कांदा-बटाटा मार्केट बंदवर तात्पुरता तोडगा; मंगळवारी मंत्रालयात बैठक* | Navarashtra
4

Navi Mumbai : APMC कांदा-बटाटा मार्केट बंदवर तात्पुरता तोडगा; मंगळवारी मंत्रालयात बैठक* | Navarashtra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.