Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मलकापूर आगारात मध्यरात्री भीषण आग; अनेक कार्यालयीन वस्तू जळून खाक, 10 लाखांचं नुकसान

मध्यरात्री लागलेल्या या आगीमुळे मलकापूर आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 29, 2026 | 02:56 PM
मलकापूर आगारात मध्यरात्री भीषण आग; अनेक कार्यालयीन वस्तू जळून खाक, 10 लाखांचं नुकसान

मलकापूर आगारात मध्यरात्री भीषण आग; अनेक कार्यालयीन वस्तू जळून खाक, 10 लाखांचं नुकसान

Follow Us
Follow Us:

शाहूवाडी : शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर एसटी आगारात गुरुवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत आगारातील संगणक कक्षासह विविध इलेक्ट्रॉनिक साहित्य, कार्यालयीन यंत्रसामग्री तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. या दुर्घटनेत प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मध्यरात्रीची वेळ असल्याने आग लागल्याचे लक्षात येताच आगार परिसरात एकच खळबळ उडाली. आगीने काही वेळातच संगणक कक्ष व कार्यालयीन साहित्याला आपल्या कवेत घेतले.

संगणक कक्षासह महत्वाचे साहित्य जळून खाक

या आगीत आगारातील प्रिंटर, पावती मशीन, पावती रोल, इंटरनेटसाठीची मशिनरी, वाय-फाय यंत्रणा, इन्व्हर्टर, बॅटरी तसेच संगणक व संगणकाशी संबंधित साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. दुसऱ्या मजल्यावरील संगणक कक्ष आणि कार्यालयीन साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. आगाराच्या दैनंदिन कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तिकिटांच्या चिठ्ठया, पावतीसंबंधी साहित्य, कार्यालयीन कागदपत्रे तसेच विविध नोंदी आगीत जळून खाक झाल्याने आगार प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. महत्त्वाची यंत्रसामग्री आणि कागदपत्रे जळाल्यामुळे तिकीट व कार्यालयीन व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

विद्युत सुरक्षा ऐरणीवर

दरम्यान, आग लागण्यामागे शॉर्टसर्किट हे प्राथमिक कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे आगारातील विद्युत व्यवस्था, वायरिंग आणि कार्यालयीन यंत्रणेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आगारातील विद्युत वायरिंग, विद्युत उपकरणे तसेच अग्निसुरक्षा यंत्रणेची सखोल तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

जीवितहानी नाही

मध्यरात्री लागलेल्या या आगीमुळे मलकापूर आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीच्या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, ही समाधानाची बाब आहे. मात्र मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री व कार्यालयीन साहित्य जळाल्याने आगाराचे आर्थिक नुकसान झाले आहे.

Navi Mumbai Crime : पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Web Title: Massive fire at malkapur depot in the middle of the night

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Fire Case
  • kolhapur news

संबंधित बातम्या

कोल्हापुरात भररस्त्यात नगरसेविकेचा विनयभंग; अश्लील हावभाव करत शिवीगाळही केली, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
1

कोल्हापुरात भररस्त्यात नगरसेविकेचा विनयभंग; अश्लील हावभाव करत शिवीगाळही केली, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.