Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Fire News : लाकडी वाडा आगीच्या भक्ष्यस्थानी! पुण्यातील नाना पेठेत घटना

Pune Nana Peth Fire News : पुण्यातील जुने पडके लाकडी वाडे हे चिंतेचा विषय निर्माण करत आहेत. नाना पेठेतील एका वाड्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 07, 2025 | 10:41 AM
Massive fire breaks out at wooden wada in Nana Peth Pune Fire News Update

Massive fire breaks out at wooden wada in Nana Peth Pune Fire News Update

Follow Us
Follow Us:

पुणे : शहरातील मध्यवर्ती भागामध्ये काल (दि.06) आगीची भीषण घटना घडली. शहरातील नाना पेठेमध्ये राम मंदिराशेजारील वाड्याला आग लागल्याची घटना घडली. जुन्या पद्धतीचा वाडा असल्यामुळे आगीचा भडका उडाला होता. लाकडी वाडा असल्यामुळे आगीने रौद्र रुप धारण केले. रामनवमी असल्यामुळे मंदिरामध्ये देखील भाविकांची गर्दी होती. पुण्यातील अग्निशमन दलाने तातडीने आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.

रात्री 08:08 वाजता नाना पेठेतील राम मंदिराजवळ ही आग लागली. पारेख वाडा असे या आग लागलेल्या वाड्याचे नाव होते. वाड्यामध्ये आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून तातडीने फायरगाड्या रवाना करण्यात आल्या होत्या. घटनास्थळी पोहोचल्यावर जवानांनी तीन मजली लाकडी जुन्या वाड्याला आग भीषण आल्याचे पाहताच अतिरिक्त मदत मागवण्यात आली. संपूर्ण धगधगता वाडा पाहण्यासाठी बघ्याची देखील मोठी गर्दी झाली होती. अग्निशमन दलाकडून एकुण 10 फायरगाड्या 4 वॉटर टँकर 2 देवदूत वाहने तसेच व्हेईकल डेपोकडून पाच वॉटर टँकर रवाना करण्यात आले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अग्निशमन दलाच्या जवानांनी वाड्याच्या तिन्ही बाजूच्या रस्त्याला अग्निशमन वाहने उभी केली. वाड्याच्या तिन्ही बाजूंनी पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला. तसेच वाड्यात कोणी राहत नसल्याची  आणि कोणी अडकले नसल्याची खात्री करण्यात आली. तसेच आगीमध्ये कोणीही जखमी नसल्याची खातरजमा केली. आगीचे लोट मोठे असल्यामुळे धूर देखील मोठ्या प्रमाणात होता. यामुळे शेजारी असलेल्या रहिवासी इमारती मधून सर्व रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविले. घरामधील सिलेंडर बाहेर घेत मोठा धोका टाळला व आग इतरत्र पसरणार नाही याची दक्षता घेण्यात आली. सुमारे तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन सुरु ठेवण्यात आले.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सदर ठिकाणी पुर्ण बाजारपेठेचा परिसर असून रस्त्याचे काम सुरु आहे. रस्ता अरुंद व काम सुरु असल्याने अग्निशमन वाहने जाण्यास अडथळा निर्माण झाला होता. अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी आगीच्या ठिकाणी उपस्थित राहून अग्निशमन दलाचे जवळपास पाच अधिकारी व किमान साठ ते सत्तर जवानांना मार्गदर्शन करत आहेत. या घटनेत कोणी मृत वा जखमी नसून आगीचे कारण आत्ता तरी समजू शकले नाही. मात्र पुणे शहरात अशा पद्धतीने जुन्या लाकडी वाड्याला आग लागल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. तसेच पडलेले आणि मोडकळीला आलेल्या जुन्या लाकडी वाड्यांचा प्रश्न आणि त्यातील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Web Title: Massive fire breaks out at wooden wada in nana peth pune fire news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 10:40 AM

Topics:  

  • Fire News
  • Pune Fire
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.