
आदरणीय पी डी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवले – बाळासाहेब पाटील
सौ. वेताळ म्हणाल्या मत्स्यपालनाच्या माध्यमातून महिलांना नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, महिला बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार, उत्पादन, व्यवस्थापन आणि बाजारपेठेशी जोडणी यामध्ये महिलांचा सहभाग वाढण्यास हातभार लागणार आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ मत्स्यपालनापुरता मर्यादित न राहता ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारा ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुकास्तरीय अभियान व्यवस्थापन, पंचायत समिती कराड अंतर्गत कृष्णामाई महिला प्रभागसंघ, कोपर्डे हवेली संलग्न वाघजाई महिला ग्रामसंघ यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्थानिक जलस्रोताचा योग्य वापर करून महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या मत्स्यपालन प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली.यावेळी विद्याताई वेताळ यांनी तलावातील मत्स्यपालन उपक्रमाची पाहणी करून महिला ग्रामसंघाच्या सदस्यांशी संवाद साधला.
जिल्हा परिषद सदस्या, विद्याताई वेताळ म्हणाले की, “ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. महिलांच्या नेतृत्वातून सुरू झालेले मत्स्यपालनासारखे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहेत. अशा उपक्रमांना आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत.”
अन्नातील भेसळीवर थेट वार! तुकाराम मुंढेंच्या कडक शिस्तीला पुण्याच्या गणेश मंडळांची अनोखी साथ