सहकारी पाणीपुरवठा संस्थेची वार्षिक सभा
बाळासाहेब पाटील म्हणाले कराड व वाखाण शिवाराचा सर्वांगिण विकास केला. संस्थेच्या कार्यालयीन इमारतीमधील हॉलचा वापर सभासद शेतकरी व परिसरातील नागरिक आपल्या धार्मिक, सांस्कतिक अथवा इतर घरगुती कार्यक्रमासाठी करीत असतात, शासनाच्या विविध शासकीय आरोग्य विषयक मोफत उपक्रमांसाठी इमारती मधील संस्थेचा हॉल विनामूल्य वापरण्यासाठी दिला आहे. मा. निवडणूक आयोगाच्या SIR या व इतर योजनांच्या अंमलबजावणीसाठी शासनाने आपल्या या इमारतीमधील हॉलचा वेळोवेळी वापर केलेला आहे. याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यालयीन इमारतीची देखभाल दुरुस्ती वेळेवर करावी अशी सुचना केली.
कराड वाकाण शिवाराचा कराड नगरपालिकेच्या वाढीव हद्द वाढीमध्ये समावेश झाल्यामुळे संस्थेचे कार्यक्षेत्र कमी होत आहे व त्याचबरोबर सभासद शेतकरी व संस्थेसमोर विविध अडचणी व प्रश्र्नांची सर्वांनी विचारविनिमय करून मार्ग काढावा, अशी सूचना माजी मंत्री पाटील यांनी केली. संस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा विशद केला. संस्थेचे सेक्रेटरी रामचंद्र पानवळ यांनी नोटीस वाचन केले.संस्थेचे व्हा. चेअरमन राजेंद्र माने यांनी आभार मानले.
सभेस माजी नगरसेवक बाबासो भोसले, माजी संचालक शिवाजी कदम, बाळासाहेब पाटील (जाधव), ज्योतिर्लिंग विकास सोसायटीचे मार्गदर्शक अरुण पाटील, चेअरमन जयंत पाटील व संचालक, कराड विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, संजीवनी नागरी सहकारी पतसंस्थेचे व कृष्णाई सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या इरिगेशन विभागाचे इंजिनिअर, संजय क्षीरसागर, आर.जी. तांबे, संस्थेचे सभासद, शेतकरी उपस्थित होते.






