
माथेरान मधील वस्तू पेटंट म्हणून विकसित करणार! सुनील तटकरे यांचे आश्वासन
शहरातील श्रीराम चौकात शिवराष्ट्र पॅनलच्या प्रचारसभेत तटकरे बोलत होते. “40 वर्षांपूर्वी मी माथेरानला आलो होतो. अवघड वाट स्वतः वाहन चालवत पार केली होती. राज्याचा सुवर्णमहोत्सवी अर्थसंकल्प मांडताना माथेरानसाठी 100 टक्के अनुदानातून योजना मंजूर केली. हा इतिहास काहींना माहिती नाही,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
Washim News: जिल्ह्यात परदेशी पाहुण्या पक्ष्यांची हजेरी वाढू लागली! हिवाळी पाहुणे महाराष्ट्रात दाखल
महिलांच्या आर्थिक सबलीकरणावर भर देत तटकरे म्हणाले, “महिला बचत गटांना प्रशिक्षण व निधी देऊन पेटंट आधारित उत्पादनांची बाजारपेठ निर्माण केली जाईल. रोजगारनिर्मितीसाठी सरकार कटिबद्ध आहे.” रस्ते, पर्यटन सुविधा, नगरपरिषद प्रशासनातील बदल, रोपवे प्रकल्प आणि वाहतूक व्यवस्थेबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
माथेरान पर्यटनाच्या विकासासाठी माजी पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी नमूद केले. “रिक्षा आली म्हणजे घोडेवाले गमावले जाणार नाहीत. कोणाच्याही व्यवसायावर अन्याय होणार नाही,” असे तटकरे म्हणाले. महिलांसाठी सुरक्षित, सुसज्ज आणि पर्यावरणपूरक माथेरान घडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
नाडी थांबलेली, हात तुटलेला… पण MBBS विद्यार्थ्याच्या तत्परतेने दुचाकीस्वाराचा जीव…
सभेत राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, “मातृशक्ती शिवराष्ट्र पॅनलच्या पाठीशी आहे. त्यामुळे विजय निश्चित आहे.” पर्यावरणपूरक आणि नियोजनबद्ध विकास हा पॅनलच्या जाहीरनाम्याचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी सांगितले.
या सभेला प्रदेश, जिल्हा आणि स्थानिक स्तरावरील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.