Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunil Tatkare on NCP Merger : ‘एनडीए’त येणाऱ्यांनीच विलीनीकरणाची भूमिका स्पष्ट करावी, सुनील तटकरे यांची भूमिका…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्ष विलनीकरणाच्या चर्चेवर आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, विलनीकरणाला वैयक्तिक विरोध नसून यावर सामूहिक निर्णय घेतला जाईल.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 02, 2026 | 04:09 PM
‘एनडीए’त येणाऱ्यांनीच विलीनीकरणाची भूमिका स्पष्ट करावी, सुनील तटकरे यांची भूमिका…

‘एनडीए’त येणाऱ्यांनीच विलीनीकरणाची भूमिका स्पष्ट करावी, सुनील तटकरे यांची भूमिका…

Follow Us
Close
Follow Us:

कराड : महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी आणि देशाला गतिमान करण्यासाठी भाजपा व मित्रपक्षांच्या एनडीएच्या माध्यमातून राज्यात सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सामूहिकरित्या घेतला असून, ही भूमिका पुढे नेणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.

भाजपप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. विशेषतः ‘विलीनीकरण कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात होणार?’ याबाबत स्पष्टता आवश्यक असून, त्याशिवाय या विषयावर चर्चा होऊ शकत नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अजितदादांच्या नेतृत्वाखाली आधीच निश्चित असून, त्याच मार्गाने वाटचाल करणे, हे आमचे कर्तव्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमजवळील वेणूताई चव्हाण स्मारकास राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याचवेळी माध्यमांशी संवाद साधताना तटकरे बोलत होते.

Ch. Sambhajinagar : भेदभावमुक्त शिक्षणासाठी आंबेडकरी संघटनांचा एल्गार; कोर्टाने अन्याय केल्याचा आंदोलकांचा आरोप

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी सुनेत्रा पवार कराड येथे आल्या होत्या. चव्हाण साहेबांचे विचार आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या अडीच वर्षांत घेतलेली वाटचाल लक्षात घेता, महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी ही जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. चव्हाण साहेबांच्या विचारांवर चालत राज्याच्या भविष्यासाठी सुनेत्रा पवार पूर्ण योगदान देतील, असा विश्वास तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपने ‘गिळंकृत’ केल्याच्या संजय राऊत यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना तटकरे यांनी, अशा टीका-टिप्पण्यांना फारसे महत्त्व नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने अजितदादांच्या नेतृत्वाखाली निर्धारपूर्वक एनडीए सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि विधानसभा निवडणुकीत १३ कोटी जनतेने या भूमिकेला कौल दिला आहे. त्यामुळे एनडीएसोबत जाण्याची भूमिका आधीच स्पष्ट असल्याचे सांगितले.

शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू असल्याचे संकेत दिल्यानंतर अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया का नाही? या प्रश्नावर तटकरे यांनी, विलीनीकरणाबाबत कोण काय प्रतिक्रिया देतो, यावर बोलणार नाही. मात्र कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात विलीनीकरण होणार, याचा खुलासा आधी झाला पाहिजे. त्यानंतरच यावर स्पष्ट भूमिका मांडता येईल, असे मत व्यक्त केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊ नयेत, यासाठी कट रचला जात असल्याच्या विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांवर तटकरे यांनी, तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले. आधी काँग्रेसने चंद्रपूरचा महापौर कोणाचा होतोय ते पाहावे. काँग्रेसमध्येच पळवा-पळवी सुरू असताना वडेट्टीवारांना आमच्या पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोला त्यांनी लगावला.

आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून ४१ जागांवर विजयी झालो असून, राष्ट्रवादी विधिमंडळ पक्ष मजबूत आहे. नेता निवडीचा अधिकार हा केवळ निवडून आलेल्या सदस्यांनाच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विलीनीकरणासंदर्भात यापूर्वी झालेल्या चर्चा पुराव्यांसह समोर आणण्याच्या दाव्यावर बोलताना, वेळ आल्यावर योग्य वेळी या विषयावर भूमिका मांडली जाईल, असे त्यांनी सांगितले. शपथविधीस शरद पवार व सुप्रिया सुळे यांना आमंत्रण नव्हते? या आरोपांवर तटकरे यांनी, राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाने एकमताने सुनेत्रा पवार यांच्या निवडीचे पत्र मुख्यमंत्र्यांना सादर केले होते आणि त्यानुसारच शपथविधी पार पडल्याचे सांगितले.

या सर्व घडामोडींमध्ये आपण आणि प्रफुल्ल पटेल ‘खलनायक’ ठरत असल्याचा आरोप फेटाळताना सुनील तटकरे म्हणाले, भाजप हा देशातील प्रमुख पक्ष असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या सहमतीने सत्तेत सहभागी आहे. भाजपाने कधीही आमच्या पक्षाचे निर्णय ठरवलेले नाहीत. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र भूमिका घेणारा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अजितदादांच्या विमान दुर्घटनेबाबत व्यक्त होत असलेल्या संशयांवर तटकरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयानेही चौकशी सुरू केली असून, ब्लॅक बॉक्स सापडला आहे. या दुर्घटनेमागील सत्य महाराष्ट्र व देशातील जनतेसमोर आले पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठाम भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

NCP Merger News: अजित पवारांची ‘शेवटची इच्छा’ पूर्ण होणार; निकटवर्तीयांचा खळबळजनक दावा

Web Title: Sunil tatkare on ncp merger with bjp nda election strategy maharashtra politics news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • BJP
  • Nationalist Congress Party
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर अंतिम शिक्क्याची प्रतीक्षा! स्थायी समितीकडून ‘या’ तारखेला मिळणार मान्यता
1

पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर अंतिम शिक्क्याची प्रतीक्षा! स्थायी समितीकडून ‘या’ तारखेला मिळणार मान्यता

Ashok Khaat : सुनिल तटकरे वादाच्या भोवऱ्यात; भोंदू अशोक खरातच्या मुलाच्या लग्नात तटकरांची हजेरी
2

Ashok Khaat : सुनिल तटकरे वादाच्या भोवऱ्यात; भोंदू अशोक खरातच्या मुलाच्या लग्नात तटकरांची हजेरी

सातारा जिल्हा परिषदेत थरारक सत्तानाट्य, मतदानावेळी पोलिसांची मोठी कारवाई; तरीही…
3

सातारा जिल्हा परिषदेत थरारक सत्तानाट्य, मतदानावेळी पोलिसांची मोठी कारवाई; तरीही…

Maharashtra Politics: “शेतमजुराच्या मुलाला ZP अध्यक्ष…”; सोलापूरमध्ये जयकुमार गोरेंचे मोठे विधान
4

Maharashtra Politics: “शेतमजुराच्या मुलाला ZP अध्यक्ष…”; सोलापूरमध्ये जयकुमार गोरेंचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.