माथेरानच्या जंगलात प्राण्यांसाठी आता ठिकठिकाणी पाणवठे, वन विभागाकडून नियोजन
कर्जत: माथेरान या जंगलात वन्य प्रमी मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचवेळी पक्षांची संख्या मोठी असून ऐन उन्हाळ्यात वन्यजीव यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दरम्यान माथेरान मधील जंगलात वन विभागाच्या वतीने पाणवठे बनविण्यात आले असून तेथे पाण्याची व्यवस्था केली जात असून प्राणी पक्षी यांच्यासाठी मोठी सोय झाली आहे.
माथेरान हे माथ्यावरील रान सात चौरस किलोमीटर मध्ये पसरले असून या शहरात मोठ्या वनसंपदा आहे.त्यामुळे शहरातील जंगलात प्राणी आणि पक्षी यांचे वास्तव्य देखील मोठ्या प्रमाणात आहे. जंगलातील प्राणी आणि पक्षी यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याने पक्षी जे सतत ओरडत असल्याचे दिसून येतात.तर प्राणी हे मानवी वस्तीकडे येऊ लागले असून काही दिवसांपूर्वी रानटी डुक्कर थेट लोकवस्तीत घुसले होते.हे लक्षात घेवून माथेरान शहरातील वन विभागाने प्राण्यांची पाण्यासाठी धावपळ आणि पक्षांची किलबिल थांबवण्यासाठी जंगल भागात पाणवठे निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.वन विभागाचे वन क्षेत्रपाल उमेश जंगम यांचे मार्गदर्शन घेवून माथेरान येथील वनपाल राजवर्धन आढे यांनी जंगल भागात फिरून प्राण्यांसाठी पाणवठे कुठे बांधायचे याचा अभ्यास केला.
त्यातून माथेरान वन विभागाने वन संरक्षण समितीचे सोबत जंगल भागातील माथेरान प्लाटो कंपार्टमेंट ४५० मध्ये रेसकोर्स भागातील विविध ठिकाणी पाणवठे निर्माण केले आहेत.तेथील रेस कोर्स तसेच बेलवेडीयर पॉइंट,या ठिकाणी दोन तसेच अन्य जंगल भागात दोन असे चार पाणवठे निर्माण केले आहेत.जंगल भागातील प्लेटो,टेरेस,चिल्ड्रन्स पार्क,रेस कोर्स येथील पाणवठे हे वन कर्मचारी यांनी त्या सर्व ठिकाणी श्रमदान करून हे पाणवठे निर्माण केले आहेत.त्यासाठी वनपाल आढे यांना वन रखक जयंत चेमटे,विवेक साळुंके, अंतेशवर भंगे,तसेच वन कर्मचारी काळूराम जामघरे,बबलू शिंगाडे,यांच्या मदतीने तयार झाले आहेत.