नांदेड सिटीमध्ये सुरक्षा रक्षकांची तरुणाला मारहाण (फोटो- ट्विटर)
पुणे: शहरातील सर्वाधिक मोठी सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड सिटीतील मधुवंती सोसायटीसाठी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून, सर्व सुरक्षा रक्षक एकत्र येऊन त्याला मारहाण करताना दिसत आहे. सुरक्षा रक्षकाच्या मुजोरीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. केवळ वाहनाला स्टिकर नाही म्हणून फ्लॅट मालकाशी वाद झाला. नंतर शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे.
नांदेड सिटी टाउनशिप सिक्युरिटी अंतर्गत काम करणारी अश्विनी नामक महिलेसह आठ ते दहा जणांवर नांदेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार ८ एप्रिल रोजी संध्याकाळी ४.३० वाजता घडला आहे.
पुणे- नांदेड सिटीत सुरक्षा रक्षकांनी फ्लॅट ओनर असलेल्या कुटूंबाशी वाद घातला. गाडीला स्टिकर नाही म्हणून हा वाद झाला. नंतर तरुणाला 8 ते 10 जणांनी मारहाण केली. #पुणे #pmc #पोलीस #fir @PuneriSpeaks @PuneCityPolice @CPPuneCity pic.twitter.com/0H3n1ZQhRd
— akshay phatak (@phatak789) April 9, 2025
माहितीनुसार, तक्रारदार त्यांच्या पती आणि दोन मुलांसह नांदेड सिटीमधील ‘मधुवंती सोसायटी’त गेल्या १० वर्षांपासून राहतात. त्यांचे पती रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. ८ एप्रिल रोजी संध्याकाळी ४.३० वाजता पती घरी जाण्यासाठी त्यांच्या मधुवंती सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर आले. त्याठिकाणी नांदेडसिटीचे सिक्युरिटी गार्ड यांन त्त्यांना गाडीला सोसायटीचे स्टिकर नसल्याने थांबवून ठेवले.
तेव्हा तक्रारदार ह्या त्यांच्या मुलासह सोसायटीचे रेसीडेन्स कार्ड घेवून गेटवर गेले. यावेळी गेट वर फिर्यादी यांच्या पतीशी तेथे कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक वाद घालून अरेरावीची भाषा करत होते. हा वाद सोडवण्यासाठी त्यांचा मुलगा पुढे आला सुरक्षा रक्षकांची भाषा उग्रट आणि दबावाची होती. त्यामुळे मुलगा व एका सुरक्षा रक्षकात प्रथम हातापाई झाली. तेव्हा सर्व सुरक्षा रक्षक येथे जमले. नंतर मात्र, या जमलेल्या आठ ते दहा सुरक्षा रक्षकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. मारहाण केल्यानंतर संबंधित कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. पुढील तपास नांदेड सिटी पोलीस करत आहेत.
https://youtube.com/live/hiBT2_XuZC