Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : पालिकेचे लाल मातीच्या रस्त्यांकडे दुर्लक्ष; घोडेस्वारांनी भरले खड्डे

माथेरान शहरातील शार्लोट लेककडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड वर आले असून त्याचा परिणाम रस्त्यांवरून घोड्यांना वाहतूक करणे कठीण होऊन बसले आहे. या समस्येकडे पालिकेचं दुर्लक्ष होत आहे,.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 18, 2025 | 02:33 PM
Matheran News : पालिकेचे लाल मातीच्या रस्त्यांकडे दुर्लक्ष; घोडेस्वारांनी भरले खड्डे
Follow Us
Follow Us:

माथेरान/संतोष पेरणे : शहरात प्रेक्षणीय स्थळांकडे जाणारे रस्ते अजूनही लाला मातीचे आहेत.माथेरान मध्ये प्रचंड पाऊस पडतो आणि त्यामुळे लाला मातीच्या रस्त्यांवर असलेली माती पाण्यासोबत वाहून जाते आणि रस्ते खराब होतात.सध्या माथेरान शहरातील शार्लोट लेककडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड वर आले असून त्याचा परिणाम रस्त्यांवरून घोड्यांना वाहतूक करणे कठीण होऊन बसले आहे. त्यात माथेरान नगरपरिषद लाल मातीच्या रस्त्यांची दुरुस्ती करीत नसल्याने घोड्यांवरून पर्यटकांना नेले धोक्याचे बनले आहे. दरम्यान माथेरानमधील घोडेस्वार यांनी आता शार्लोट लेक ते ब्राईडलँड हॉटेल या रस्त्यावरील मोठं मोठे दगड स्वतः उचलून रस्त्यावरून घोड्यांची वाहतूक सुखकर होण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस होणार; सांगली, सातारा, कोल्हापूरसह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

माथेरान शहरात लाल मातीचे रस्ते असून कोणत्याही प्रकारच्या वाहनांना बंदी आहे.माथेरान मध्ये घोडा हे अवहातुकीचे साधन असून आता माथेरान शहरातील हुतात्मा चौकात येण्यासाठी पर्यावरण पूरक ई रिक्षा यामधून प्रवासी वाहतूक सुरु आहे. मात्र शहरातील प्रेक्षणीय स्थळी जाण्यासाठी घोडे हा पर्याय पूर्वीपासून आहे तो तसाच आहे. माथेरान शहरात अजूनही प्रेक्षणीय स्थळांकडे जाणारे रस्ते हे लाल मातीचे असून त्या रस्त्यांची दरवर्षी दुरुस्ती करावे लागते. मात्र माथेरानमधील पाऊस मोठा असल्याने लाल मातीचे रस्ते खराब होतात. शहरातिल ब्राइटलँड ते शार्लोट लेक या रस्त्यावर टाकण्यात आलेली माती धुवून गेली असून रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठं मोठे दगड यांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे रस्त्याने वाहतूक करणारे घोडे आणि त्या घोड्यांवरून प्रवास करणारे पर्यटक यांच्यासाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. पालिकेकडे त्या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी सातत्याने घोडेस्वारांकडून मागणी केली जात होती.

मात्र माथेरान नगरपरिषदेकडून रस्त्याची दुरुस्ती करण्याची कोणतीही कार्यवाही केली जात नाही आणि त्यामुळे शेवटी प्रवासी पर्यटक यांचा जीवाला धोका निर्माण होऊ नये. त्यासाठी आता घोडेस्वारांनी स्वतःच रस्त्यावरील दगड बाजूला करून खड्डे भरण्याची कामं केली आहेत. माथेरान शहरातील घोडेवाले यांनी रस्त्यासाठी श्रमदान केले असून त्यामुळे रस्त्यावरून येजा करणे सोपे होत आहे. माथेरान पालिकेच्या या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे कोणत्या घोड्याला अपघात झाल्यास पालिका जबाबदार असणार आहे. त्याचवेळी त्या घोड्यावरून प्रवास करणारे पर्यटक यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होण्याची भीती अशा प्रकारच्या रस्त्यामुळे निर्माण झाली आहे असा आरोप घोडेस्वार करीत आहेत.

Raigad News : अवैद्य गौण खनिजांची वाहतूक बंद करा; गुन्हेगारांपासून भयमुक्त रस्त्यासाठी दुरशेत ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन

Web Title: Matheran news municipality neglects red clay roads horse riders fill potholes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 02:33 PM

Topics:  

  • Maharashtra Tourism
  • matheran news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Bharat Gogawale : ‘रायगडचं डिक्लेरेशन घेण्यासाठी..’; भरत गोगावलेंची मिश्किल टिप्पणी, पालकमंत्रिपदावरून महायुतीत पुन्हा धुसफूस
1

Bharat Gogawale : ‘रायगडचं डिक्लेरेशन घेण्यासाठी..’; भरत गोगावलेंची मिश्किल टिप्पणी, पालकमंत्रिपदावरून महायुतीत पुन्हा धुसफूस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.