Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा शुकशुकाट! सुट्ट्या संपताच पर्यटकांची गर्दी ओसरली, विक्रेत्यांची चिंता वाढली

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला श्रीवर्धन समुद्र‌किनाऱ्यावर पर्यटकांची लगबग वाढली होती. मात्र आता समुद्रकिनाऱ्यावर शुकशुकाट जाणवू लागला आहे. तसेच, हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची चिंता देखील वाढू लागली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 21, 2026 | 01:47 PM
Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा शुकशुकाट! सुट्ट्या संपताच पर्यटकांची गर्दी ओसरली, विक्रेत्यांची चिंता वाढली

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा शुकशुकाट! सुट्ट्या संपताच पर्यटकांची गर्दी ओसरली, विक्रेत्यांची चिंता वाढली

Follow Us
Follow Us:
  • सुट्ट्यांचा कालावधी संपताच पर्यटकांची संख्या पुन्हा घटू लागली
  • हॉटेल व्यावसायिकांसह पर्यटनावर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची चिंता वाढली
  • ऑक्टोबरच्या सुरुवातीला सलग सुट्ट्या मिळाल्याने पर्यटकांनी श्रीवर्धनकडे धाव
श्रीवर्धन: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सलग सुट्ट्यांचा योग जुळून आल्याने श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली होती. समुद्र‌किनाऱ्यावर पर्यटकांची लगबग, हॉटेलमध्ये वाढलेली वर्दळ आणि पर्यटन व्यवसायांमध्ये निर्माण झालेली आर्थिक उलाढाल यामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. सुट्ट्यांचा कालावधी संपताच पर्यटकांची संख्या पुन्हा घटू लागल्याने समुद्रकिनाऱ्यावर शुकशुकाट जाणवू लागला आहे. हॉटेल व्यावसायिकांसह पर्यटनावर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.

टायगर लक्ष्यावर नव्हताच! आधी अमिताभ, आमीर, अक्षयची रेकी; ‘डेड लेटर बॉक्स’ने मुंबईत आले शस्त्र

सलग सुट्टयांच्या काळात पर्यटकांची संख्या वाढते

श्रीवर्धन हे कोकणातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. विस्तीर्ण समुद्रकिनारा, निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि शांत वातावरणामुळे राज्याच्या विविध भागांतून पर्यटक येत असतात. शनिवार-रविवार आणि सलग सुट्टयांच्या काळात पर्यटकांची संख्या वाढते. ऑक्टोबरच्या सुरुवातीला सलग सुट्ट्या मिळाल्याने पर्यटकांनी श्रीवर्धनकडे धाव घेतली होती. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची वर्दळ वाढली होती, तर हॉटेल, लॉजिंग, खानावळी आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरही गर्दी पाहायला मिळाली. सुट्टया संपल्यानंतर परिस्थिती बदलली असून, पूर्वी पर्यटकांच्या वर्दळीने गजबजलेला परिसर आता तुलनेने शांत दिसू लागला आहे.

पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यवसायांवर परिणामाची भीती व्यक्त

अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. हॉटेल, लॉजिंग, खानावळी, चहा-नाश्त्याची दुकाने, खाद्यपदार्थ विक्रेते, विविध सुविधा पुरविणाऱ्या व्यावसायिकांसमोर आव्हान ठरत आहे. पर्यटकांची संख्या कमी झाल्याने हॉटेलमधील खोल्यांची मागणी घटते, तसेच खाद्यपदार्थ आणि इतर सेवांच्या विक्रीवरही परिणाम होतो.

Mira Bhayandar: महासभेत हाणामारी, तरीही शेकडो कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी; भाजपच्या कारभारावर विरोधकांचा आक्षेप; नेमकं काय घडलं?

पर्यटनाच्या हंगामाकडे व्यावसायिकांच्या नजरा

श्रीवर्धनच्या पर्यटन व्यवसायाला वर्षभर चालना मिळण्यासाठी केवळ सलग सुट्ट्यांवर अवलंबून न राहता पर्यटकांचा नियमित ओघ टिकवणे आवश्यक आहे. समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता, सुरक्षितता, मूलभूत सुविधा, वाहनतळ व्यवस्था आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या उपक्रमांवर भर दिल्यास पर्यटन व्यवसायाला अधिक चालना मिळेल. सुट्टयांच्या काळात पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेला श्रीवर्धनचा समुद्रकिनारा आता पुन्हा पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे. आगामी काळात पर्यटकांची संख्या वाढून पर्यटन व्यवसायाला पुन्हा तेजी येते का, याकडे स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटनाशी संबंधित घटकांचे लक्ष लागले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Shrivardhan beach turns quiet after holiday rush tourism businesses face a slowdown hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • Raigad News

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil On Eknath Shinde: शिंदे साहेब, ५०० कोटी घेतले का? फक्त हो किंवा नाही सांगा; जरांगेंची मागणी
1

Manoj Jarange Patil On Eknath Shinde: शिंदे साहेब, ५०० कोटी घेतले का? फक्त हो किंवा नाही सांगा; जरांगेंची मागणी

Raigad News: सोनं महागलं, तरी खरेदीचा उत्साह कायम! दसऱ्याला रायगडच्या बाजारपेठा फुलल्या, वाहनांचीही विक्री
2

Raigad News: सोनं महागलं, तरी खरेदीचा उत्साह कायम! दसऱ्याला रायगडच्या बाजारपेठा फुलल्या, वाहनांचीही विक्री

मुंबईतील ८७ बेकऱ्यांवर कारवाईचा बडगा? लाकूड-कोळशाचा वापर बंद करण्यासाठी पालिका आक्रमक
3

मुंबईतील ८७ बेकऱ्यांवर कारवाईचा बडगा? लाकूड-कोळशाचा वापर बंद करण्यासाठी पालिका आक्रमक

Chhatrapati Sugar Factory:‘वजन चोख, पैसे रोख’ धोरणाचा छत्रपती कारखान्याला फायदा!
4

Chhatrapati Sugar Factory:‘वजन चोख, पैसे रोख’ धोरणाचा छत्रपती कारखान्याला फायदा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.