Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maval Politics: मावळचा विकास की केवळ घोषणाबाजी? सुनील शेळके यांचा बाळा भेगडेंना थेट सवाल

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीच्या दहा गणांमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 20, 2026 | 04:31 PM
Maval Politics: मावळचा विकास की केवळ घोषणाबाजी? सुनील शेळके यांचा बाळा भेगडेंना थेट सवाल
Follow Us
Close
Follow Us:
  • “मावळच्या जनतेने मला आमदार म्हणून निवडून दिले-  सुनील शेळके
  • अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर विकासकामांना गती
  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल
Maharashtra Zilla Parishad Election 2026 : मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून अवघ्या एका वर्षात तब्बल २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला, असे ठामपणे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यावर जोरदार टीका केली.

“मावळच्या जनतेने मला आमदार म्हणून निवडून दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर विकासकामांना गती मिळाली. मात्र विरोधकांनी दहा वर्षांत तरी २० कोटी रुपयांचा निधी आणला आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विकास, स्थैर्य आणि कामगिरीच्या मुद्द्यावर विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

BMC Mayoral Suspense: आरक्षणाच्या अनिश्चिततेमुळे मुंबईच्या महापौर पदाचा सस्पेन्स कायम

या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेश आप्पा ढोरे, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, नारायण भालेकर, युवक अध्यक्ष अजित सातकर यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीतील सर्व गट व गणांतील महिला उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीच्या दहा गणांमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात व जल्लोषात भव्य मिरवणूक काढत शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

जिल्हा परिषद – गटनिहाय उमेदवार
टाकवे बुद्रुक–नाणे : अनंता पावशे
वराळे–इंदोरी : पल्लवी संदीप दाभाडे
खडकाळा–कार्ला : दीपाली दीपक हुलावळे
कुसगाव–काले : संतोष गबळू राऊत
सोमाटणे–चांदखेड : मनीषा नितीन मुन्हे
पंचायत समिती – गणनिहाय उमेदवार
टाकवे बुद्रुक : प्राची देवा गायकवाड
नाणे : आशा ज्ञानेश्वर मोरमारे
इंदोरी : दिलीप नामदेव ढोरे
कार्ला : रेश्मा राजू देवकर
खडकाळा : समीर खंडू जाधव
कुसगाव : योगेश मुरलीधर लोहोर
काले : शैला रामचंद्र कालेकर
सोमाटणे : साहेबराव नारायण कारके
चांदखेड : सुनिता मनोहर येवले

Nashik News : तब्बल चार वर्षात 1985 बालकाचा मृत्यू , नाशिकमधील धक्कादायक आकडेवारी समोर

या सर्व उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आले आहेत. “मावळ तालुक्यातील विकासकामे, स्थैर्य आणि आमची ठोस कामगिरी पाहता जनता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसलाच कौल देईल,” असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

Web Title: Maval politics development of maval or just empty promises sunil shelke poses a direct question to bala bhegade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • Maharashtra Zilla Parishads Election
  • Panchayat Samiti Elections

संबंधित बातम्या

Chiplun News: आगामी निवडणुकीसाठी BJP ने जाहीर केली उमेदवारी; कोण कुठे लढणार?
1

Chiplun News: आगामी निवडणुकीसाठी BJP ने जाहीर केली उमेदवारी; कोण कुठे लढणार?

हातकणंगलेत जिल्हा परिषदेसाठी 4 तर पंचायत समितीसाठी एक अर्ज दाखल; आत्तापर्यंत 713 अर्जांची विक्री
2

हातकणंगलेत जिल्हा परिषदेसाठी 4 तर पंचायत समितीसाठी एक अर्ज दाखल; आत्तापर्यंत 713 अर्जांची विक्री

Maharashtra Politics: वडगाव मावळमध्ये अनोखा अंदाज; एकूण 15 जागांवर ‘मविआ’ म्हणून ‘हे’ पक्ष लढणार
3

Maharashtra Politics: वडगाव मावळमध्ये अनोखा अंदाज; एकूण 15 जागांवर ‘मविआ’ म्हणून ‘हे’ पक्ष लढणार

Maharashtra Politics: महायुती तुटणार? राजकारणात मोठा भूकंप! दोन्ही पवार एकत्र; भाजपचे काय?
4

Maharashtra Politics: महायुती तुटणार? राजकारणात मोठा भूकंप! दोन्ही पवार एकत्र; भाजपचे काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.