तब्बल चार वर्षात 1985 बालकांचा मृत्यू , नाशिकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
Nashik News Marathi : नाशिक जिल्ह्यात कुपोषित बालकांची आकडेवारी समोर आल्यानंतर चार वर्षात १९८५ बालमृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ही सर्व बालके ते ५ वयोगटातील आणि कमी वजनाची असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला व बाकल्याण विभागाने डिसेंबरमध्ये बालकांची वजन तपासले होते. त्यात मध्यम गंभीर कुपोषित श्रेणीत ३,२४२ तर ४४० बालके तीव गंभीर श्रेणीतील असल्याचे आढळले आहे. मध्यम कमी वजनाची २१,३४७ बालके आढळली, वजन तीव्र कमी श्रेणीत ५,१३६ बालके होती. जिल्ह्यात चार वर्षात जे काही बालमृत्यू झाले ती बालके कमी वजनाची असल्याची माहिती सूत्रांनी दिली. २०२१-२२ मध्ये ते १ वर्ष वयोगटातील ५५१ तर ० ते ५ वर्ष वयोगटातील १०५ बालकांना मृत्यूने गाठले. या वर्षात एकूण ८१,२२५ बालके जन्माला आली. दुसऱ्या वर्षात म्हणजे २०२२-२३ मध्ये ० ते १ वर्ष वयोगटातील ५४० बालके दगावली. तर ते ५ वर्ष वयोगटातील १०५ बालकांनी जीव गमावला.
एक वर्षांतील मृत्यू होणाऱ्या बालकांची संख्या ११ ने कमी झाली. पण, पाच वर्षापर्यंतच्या बालकांची संख्या जेवढी आधीच्या वर्षात होती तेवढीच दुसऱ्या वर्षातही कायम राहिली. २०२३-२४ मध्ये ० ते १ वर्ष वयोगटातील ४२३ बालके दगावली तर ते ५ वर्ष वयोगटातील ८६ बालकांनाही मृत्यूने गाठले, २०२४ च्या अकरा महिन्यातही बालमृत्यूचे प्रमाण बऱ्यापैकी होते. या अकरा महिन्यात ते १ वयोगटातील १३५ व० ते ५ वर्ष वयोगटातील ४० बालकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या वर्षांपासून आरोग्य विभाग व महिला व बाल कल्याण विभागाने कुषोषण निर्मुलनावर विशेष लक्ष केंद्रीत केले. त्यातून मोठा हातभार लागल्याने तीव कुषोषणातून बालकांना बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. यंदा त्यात मोठा सकारात्मक बदल होऊन कुपोषणामुळे बालमृत्यूंचे प्रमाणही घटले आहे.
दरम्यान, केंद्रीय अहवालानुसार, राज्यातील मृत्युदर देशातील सरासरी बालमृत्यू दराच्या तुलनेत कमी आहे. देशात नवजात शिशु मृत्युदर २० आहे, तर महाराष्ट्राचा दर ११ आहे. तसेच, देशात ५ वर्षांखालील बालकांचा मृत्युदर ३२ आहे; महाराष्ट्रात हा दर १८ आहे. इतकेच नाही तर देशात बालमृत्यूंची संख्या २८ आहे, तर महाराष्ट्रात हा दर १६ आहे. नवजात शिशु संगोपन, बाल उपचार केंद्रे, पोषण पुनर्वसन केंद्रे, गृह-आधारित नवजात शिशु संगोपन, राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम, नेमियामुक्त भारत, जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान आणि नवसंजीवनी योजनांद्वारे मृत्युदर कमी होत आहे.
राज्यातील बाल मृत्यूची आकडेवारी
वर्ष – बालमृत्यू
2021-22 – 16,478
2022-23 – 15,150
2023-24 – 11,873






