
Tapovan Tree Cutting, Sadhu Gram Trees,
सोमवारी सकाळी बारा वाजता महापालिकेच्या सभागृहात सर्वच पर्यावरण प्रेमींना बोलावून त्यांचे म्हणणे जाणून घेण्यात आले. यावेळी आयुक्त मनिषा खत्री यांनी महापालिकेची भूमिका मांडली. साधुग्राममध्ये १८२५ झाडे तोडण्याचा प्रस्ताव कधीच नव्हता तर तो फक्त सर्व्हे असून, बांधकाम विभागाने त्यांच्या कामासाठी १५०० झाडे तोडावी लागतील असे सांगितले. मात्र त्याचाही सर्व्हे सुरू असून, उद्यान विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाकडे येईल व त्यानंतर अंतीम निर्णय होणार असल्याचे खत्री यांनी सांगितले, रात्री बेरात्री कोणतेही झाड तोडले जाणार नाही असा विश्वासही त्यांनी दिला. दरम्यान, यावर वृक्षप्रेमींनी अनेक प्रश्न उपस्थित करून धारेवर धरले.
Jai Anmol Ambani: अनिल अंबानीचा मुलगा जय अनमोलवर FIR दाखल, तब्बल 228 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप
साधूग्रामच्या जागेचा वापर कुंभमेळ्यासाठीच होणार असेल तर त्याजागी भारत मंडपम कसे करणार? त्यासाठी टेंडर कसे काढले. साधुग्राममधील १० पैकी ८ सव्हें राखीव आहेत. तर दोन साधूग्रामासाठी आहे. मग भारत मंडपम कुठे उभारणा असा सवाल केला. भारत मंडपमसाठी झाडे तोडणार नाही असे एकीकडे सांगितले जात असतांना दुसरीकडे झाडे तोडीची नोटीस का काढली अशी विचारणाही देवांग जानी यांनी केली.
सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. पर्यावरण व वृक्षप्रेमींनी आपल्या भूमिकेशी ठाम राहात तपोवनातील एकही झाड तोडू दिले जाणार नसल्याचे सांगितले. तसेच मनपा प्रशासनाशी बैठक झाली असली तरी, त्यावर कोणताही तोडगा न निघाल्याने तपोवनातील आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जाहीर केले, तत्पुर्वी बैठकीत सहभागी होण्यापुर्वी पर्यावरण प्रेमीनी रजिष्टरवर ‘हरकत कायम ठेवून’ बैठकीस हजर होत असल्याचे नमूद केले तर अनेकांनी आपले लेखी म्हणणे आयुक्तांना सादर केले.
महापालिका प्रशासनाने ठराविक पर्यावरणप्रेमींनाच चर्चेसाठी बोलविल्याचा आरोप करत काही आंदोलकांनी मनपा आयुक्त दालनासमोरच ‘तपोवन वाचवा, नाशिक वाचवा’, बंद दाराआड चर्चा नको, खुले आम चर्चा करा… अशी घोषणाबाजी करत विय्या आंदोलन केले, त्यानंतर मनपाचे उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी मध्यस्थी करत आंदोलकांपैकी सुरेश मारू, मराठी अभिनेत्री जिविका सोनार, प्रियंका बधान यांनी तिघांना आयुक्तांसमवेत सुरू असलेल्या चर्चेत सहभागी करून घेतले, त्यानंतर आंदोलन लांबले.
Accident News: कुंभार्ली घाटात एसटी बस अन् रिक्षाचा भीषण अपघात; रिक्षात बसलेली महिला थेट
तपोवनात एमआयसी हथ अर्थातच भारत मंडपम उभारण्याचा कोणताही फायनल ले आऊट झालेला नाही त्यामुळे ते रद्द करण्याबाबत कायदेशीर बाबींचा अभ्यास केला जाईल. त्यासाठी मंत्रीमहोदयांशी चर्चा करण्यात येईल असे सांगून आयुक्त मनिषा खत्री यांनी महापालिकेची भूमिका विषद केली. एमआयसी हबसाठी महापालिकेचा एकही पैसा खर्च होणार नाही. संबंधित कंपनी ते बांधेल व अकरा वर्षे वापरून एका वर्षासाठी पुन्हा महापालिकेच्या ताब्यात देईल ती योजना आहे. असे सांगून, साधुग्राममध्ये साधु महंत व आखाड्यांची सोय करण्यासाठी जर्मन शेड उभारण्यात येणार आहे.
जर्मन शेडसाठी काही झाडे काढावी लागतील. झाडे काढली नाही तर शेड कसे उभारणार? असा सवालही त्यांनी केला, साधुना जर्मन शेड हवे की नको हे त्यांनी सागावे. पावसाळ्यात तात्पुरते शेडला गळती लागण्याची शक्यता आहे. त्यातून साथ रोगांना निमंत्रण मिळेल, अशी भितीही खत्री यांनी व्यक्त केली, कुंभमेळा व पर्यावरण याचा मेळ ठेवूनच काही तरी मध्यस्थी मार्ग काढावा लागेल, पर्यावरण प्रेमीचे म्हणणे जाणून घेतले आहे, त्याचे इतिवृत्त तयार होईल व त्यानतरच अंतीम निर्णय घेतला जाईल, असेही शेवटी आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले.