कुंभार्लीत रिक्षा-एसटी अपघात (फोटो- सोशल मीडिया)
कुंभार्लीत रिक्षा-एसटी अपघात
दोघांविरोधात गुन्हा झाला दाखल
चालकाने हयगयीने व भरधाव वेगात चालवली रिक्षा
चिपळूण: चिपळूण (Chiplun)कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात रिक्षा व एसटी बस यांच्यात भीषण अपघात झाला. घाटातील सोनपात्राजवळ असलेल्या एका वळणावर ही दुर्घटना घडली. या अपघातात रिक्षातील एक महिला प्रवासी जखमी झाली आहे, तर एसटी बसचेही मोठे नुकसान झाले आहे. याबाबतची फिर्याद एस. टी. बस चालक अरुण चापु माळवदे (वय ३६, चिपळूण) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिली.
घाटातील वाहतुकीवर काही काळ झाला होता परिणाम
पोलिसांनी या दोन्ही आरोपविरुद्ध भारतीय दंड संहिता कायद्याच्या कलम २८१, १२५, १२५ (अ), १२५/३), ३२४ा ३) तसेध मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपीना रात्री ८.३० वाजता अटक करण्यात आली. या घटनेमुळे कुभार्ली घाटातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
चालकाने हयगयीने व भरधाव वेगात चालवली रिक्षा
यानुसार, हे आपल्या ताब्यातील एस. टी. ‘चिपळूण ते पिंपरी विधवह जाणारी एसटी बस कुंभाली घाट चढ़ात घेऊन जात होते. सीनपात्राच्या पुढील बाजूला असलेल्या एका वळणावर असताना, कराड बाजूकडून चिपळूण बाजूकडे घाट उतरणान्या एका रिक्षाने एसटी बसला जोरदार धडक दिली. रिक्षा चालक राकेश शि (वय ४९, रा. कोळकेवाडी, चिपळूण) यांनी रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता, तसेच हयगयीने व भरधाव वेगात रिक्षा चालविल्यामुळे हा अपघात घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. रिक्षाने थेट एसटी बसच्या ड्रायव्हर बाजूकडील मागील चाकावर टोकर दिली. या अपघातात रिक्षातील प्रवासी चंद्रकला चंद्रकांत शिंदे (रा. कोळकेवाडी, चिपळूण) या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर संतप्त झालेल्या पार्थ राकेश शिंदे (वय २०, रा. कोळकेवाडी, चिपळूण) याने रागाच्या भरात एसटी बसची पुढील काच फोडून तिचे नुकसान केले.
Accident News: अति वेगाने कार आली अन्…; लोणावळ्यामध्ये भीषण अपघात; 2 ठार तर टेम्पो चालक…
लोणावळ्यामध्ये भीषण अपघात
मावळ तालुक्यातील लोणावळ्यामध्ये असलेल्या लायन्स पॉईंट जवळ कार आणि टेम्पो यांच्यात शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, टेम्पो चालक गंभीर जखमी झाला आहे. योगेश सुतार आणि मयूर वेंगुर्लेकर (दोघेही रा. म्हापसा, गोवा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, लोणावळ्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने सहराकडे जाणाऱ्या टेम्पोला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, कारमधील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.






