Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hasan Mushrif : ‘वारी वर्षातून एकदा असते, अन् नमाज दिवसातून…’ ; वादग्रस्त विधान करणाऱ्या अबू आझमींना मुश्रीफांनी सुनावलं

महाराष्ट्रात सध्या आषाढी वारीमुळे वातावरण भक्तीमय झाले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठलनामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 23, 2025 | 08:27 PM
'वारी वर्षातून एकदा असते, अन् नमाज दिवसातून...' ; वादग्रस्त विधान करणाऱ्या अबू आझमींना मुश्रीफांनी सुनावलं

'वारी वर्षातून एकदा असते, अन् नमाज दिवसातून...' ; वादग्रस्त विधान करणाऱ्या अबू आझमींना मुश्रीफांनी सुनावलं

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रात सध्या आषाढी वारीमुळे वातावरण भक्तीमय झाले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठलनामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलं आहे.. वारी मार्गावर वारकऱ्यांचे जोरदार स्वागत होत असून, शासनाकडूनही त्यांच्या सोयीसाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. दरम्यान या भक्तिमय वातावरणात समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांना चांगलंच सुनावलं आहे.

Abu Azmi : पालख्यांमुळे रस्ता जाम होतो, आम्ही 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण केलं तर… : अबू आझमींच वादग्रस्त वक्तव्य

पालख्यांमुळे रस्ता जाम होतो. हिंदूचे अनेक सण रस्त्यावर साजरे केले जातात. मात्र अशावेळी मुस्लिम समाज हिंदू सणांविरोधात तक्रार करत नाही. मात्र मुस्लिम समाज दहा मिनिटासाठी रस्त्यावर नमाज पठण केलं तरी तक्रारी केल्या जातात, असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होतं. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्याचे पासपोर्ट रद्द करण्याची धमकी दिली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आझमींच्या विधानाला भाजपप्रेरित असल्याचा आरोप केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ यांनीही या वादात उडी घेत चांगलंच फटकारलं आहे.

Abu Azmi : खामेनेई यांच्यात भारतीय रक्त, अमेरिकेला…; इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अबू आझमींचं वक्तव्य

“अबू आझमींना वारकरी संप्रदायाची खरी माहितीच नाही,” असं म्हणत मुश्रीफ म्हणाले, “वारी ही वर्षातून एकदाच होते, तर नमाज दिवसातून पाच वेळा. नमाज अशा जागी पढली पाहिजे की इतरांना त्रास होऊ नये. वारीसाठी सरकारने नवीन पालखी मार्ग तयार केले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांविषयी गैरसमज पसरवू नये, असं अबू आझमी भेटले तर नीट समजावून सांगेन, असं त्यांनी म्हटलं आहे. या विधानामुळे अबू आझमींच्या वक्तव्यावर आणखी टीका सुरू झाली असून, धार्मिक समजूतदारपणा आणि सहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Web Title: Minister hasan mushrif slams abu azmi statement on ashadhi wari namaz controversy latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 08:27 PM

Topics:  

  • Abu Azmi
  • Ashadhi Wari
  • Hasan Mushrif

संबंधित बातम्या

“रस्त्यावर नमाज पडणे हा शौक नाही, तर…”, नमाजच्या निर्णयावर अबू आझमींचा भाजपवर घणाघाती हल्ला
1

“रस्त्यावर नमाज पडणे हा शौक नाही, तर…”, नमाजच्या निर्णयावर अबू आझमींचा भाजपवर घणाघाती हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.