पालख्यांमुळे रस्ता जाम होतो, आम्ही 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण केलं तर... : अबू आझमींच वादग्रस्त वक्तव्य
पालख्यांमुळे रस्ता जाम होतो. हिंदूंचे सण साजरे केले जातात त्यावेळी मुस्लिम समाज विरोध करत नाही. मात्र मुस्लिमांनी 10 मिनिटे रस्त्यावर नमाज पठण केलं तर आमच्यावर कारवाया होतात, असे वक्तव्य आमदार अबू आझमी यांनी केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणांहून वारकऱ्यांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केलं असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. दरम्यान त्यांच्या आजच्या विधानाने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
पालख्यांमुळे रस्ता जाम होतो. हिंदूचे अनेक सण रस्त्यावर साजरे केले जातात. मात्र अशावेळी कोणताही मुस्लिम व्यक्ती हिंदू सणांविरोधात तक्रार करत नाही. मात्र मुस्लिम समाज दहा मिनिटासाठी रस्त्यावर नमाज पठण केलं तरी तक्रारी दाखल केल्या जातात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्याचे पासपोर्ट रद्द करण्याची धमकी दिली आहे, असा आरोप अबू आझमी यांनी केला आहे.
यावेळी अबू आझमी यांनी राज्यात आणि देशात घडत असलेल्या अनेक विषयांवरही भाष्य केलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दल बोलताना ते म्हणाले, शरद पवार एक मोठे नेते आहेत. मात्र शरद पवार यांची त्यांच्या जवळच्या माणसांनी साथ सोडली ती केवळ ईडी आणि इन्कम टॅक्समुळे सोडली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर शिवसेनेची ताकद कमी होईल. दोघंही एकाच घरात जन्माला आलेले भाऊ आहेत, त्यामुळे ते एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे. मात्र राज ठाकरेंची स्वत:ची ताकद नाही. ते फक्त द्वेषाचं राजकारण करतात. दरवेळी उत्तर भारतीयांविरोधात बोलणं एवढंच त्यांचं काम असल्याची टीका त्यांनी केली आहे.
Hindi Language News: हिंदी भाषा सक्तीबाबत खोटे विधान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस
भाषेसाठी आपल्या संसदेत ४५ सदस्यांची एक कमिटी आहे. ही कमिटी भारतभर जाऊन हिंदीतून काम करण्यासाठी प्रोत्साहन देतात. केंद्र सरकारचं संपूर्ण काम हिंदीतून असतं आणि जर महाराष्ट्रात तीन भाषा असतील तर सगळ्यात पहिल्यांदा मराठी भाषा असली पाहिजे. तसंच दुसरी भाषा हिंदी आणि त्यानंतर इंग्रजी भाषा असली पाहिजे. मात्र महाराष्ट्र जर तिसऱ्या भाषेला विरोध होत असेल तर हिंदी व्यतीरिक्त दुसरी कोणती भाषा हवी हे तुम्हीच सांगा, असंही अबू आझमी यांनी म्हटलं आहे.