Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश

Maharashtra News : नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ ४९ टक्के पावसाची नोंद झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जलसंधारण, भूजलवाढ, टँकर व जलस्रोतांचे नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिले. शेतकरी, मजूर पशुधनासाठीही तातडीच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 06, 2026 | 07:49 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • पर्जन्यमान कमी; दुष्काळी गावांमध्ये उपाययोजनांना गती
  • पाणीटंचाई रोखण्यासाठी टँकर आणि जलस्रोतांचे नियोजन
  • शेतकरी, मजूर आणि पशुधनासाठी प्रशासन सज्ज
Maharashtra News :नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी भूजल पातळी वाढविणाऱ्या जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिले.

पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करताना टँकर, पाणीसाठे आणि उपलब्ध जलस्रोतांचे नियोजन आतापासूनच करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

पर्जन्यमान कमी; दुष्काळी गावांमध्ये उपाययोजनांना गती

नंदुरबार जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ८६०.४० मि.मी. आहे. मात्र यंदा आतापर्यंत केवळ ४२४.१० मि.मी., म्हणजे सरासरीच्या ४९ टक्के पाऊस झाला आहे. अक्राणी तालुक्यात ३९.७० टक्के, तळोदा तालुक्यात ४०.६० टक्के आणि नंदुरबार तालुक्यात ४१.४० टक्के पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे.

त्यामुळे अवर्षणप्रवण गावांमध्ये आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीत पर्जन्यमान, जलजीवन मिशन, शेतीची स्थिती, पीक पंचनामे, चारा आणि रोजगाराच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन! ‘Participate Mumbai’मुळे शहराच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग

पाणीटंचाई रोखण्यासाठी टँकर आणि जलस्रोतांचे नियोजन

उष्णतेमुळे नैसर्गिक जलस्रोत तसेच भूजल पातळी कमी होत असल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करून पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश मुश्रीफ यांनी दिले. गरज भासल्यास टँकरची व्यवस्था करण्याबरोबरच छोटे टँकर खरेदी करण्याचे नियोजन करण्यास सांगण्यात आले.

अनधिकृत पाणी उपशावर कठोर निर्बंध घालून उपलब्ध पाणीसाठ्याचा काटेकोर वापर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा नियोजन विकास निधीतून हाती घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये जलव्यवस्थापन आणि जलसंधारणाला विशेष प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

KDMC News: डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग, कर्मचारीही गायब! उपायुक्तांच्या सरप्राईज व्हिजिटमध्ये सुमित एलकोच्या कामाची पोलखोल

शेतकरी, मजूर आणि पशुधनासाठी प्रशासन सज्ज

खरीप हंगाम २०२६ मध्ये ‘ट्रिगर-१’ लागू झालेल्या तालुक्यांतील दुष्काळग्रस्त पिकांचे पंचनामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांना आवश्यक मदत आणि पाण्याची उपलब्धता करून देण्यावर भर देण्यात आला. दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी पुरेसा चारा व वैरण उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्याचेही निर्देश आहेत.

मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी ग्रामपंचायतीनिहाय रोजगाराची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करावीत. रोजगार हमी योजनेत जलसंधारण, जलसाठे आणि भूजल पातळी वाढविणारी कामे हाती घेऊन त्यातून अधिकाधिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

 

Web Title: Maharashtra news focus on water conservation to boost groundwater levels hasan mushrif directs the administrationcp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • drought news
  • Hasan Mushrif
  • Maharshtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News :युरोपच्या कार बाजाराला चीनचा धक्का;व्यापारयुद्धासाठी नवा डाव
1

World News :युरोपच्या कार बाजाराला चीनचा धक्का;व्यापारयुद्धासाठी नवा डाव

America Breaking :ट्रम्प यांच्या जाहिरातींवर सरकारी पैसा; दोन्ही पक्षांचा विरोध होताच घेतला मोठा निर्णय
2

America Breaking :ट्रम्प यांच्या जाहिरातींवर सरकारी पैसा; दोन्ही पक्षांचा विरोध होताच घेतला मोठा निर्णय

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट
3

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी
4

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.