Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता ‘स्मार्ट’ शिक्षण! जयकुमार गोरेंच्या हस्ते डिजिटल वर्गाचे लोकार्पण

अत्याधुनिक शैक्षणिक साधनसामग्री, स्मार्ट क्लासरूम, संगणकीय सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 28, 2026 | 02:49 PM
Minister Jaykumar Gore Inaugurates Hi-Tech Digital Classroom at Enkul ZP School in Satara

Minister Jaykumar Gore Inaugurates Hi-Tech Digital Classroom at Enkul ZP School in Satara

Follow Us
Follow Us:

 

Waduj: एनकूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या डिजिटल क्लासरूमसाठी पुणे पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष व पुणे जिल्हा (दक्षिण) भाजपा प्रभारी सदाशिव खाडे यांच्या ब्रह्मचैतन्य फाउंडेशनच्या सीएसआर फंडामधून १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्या निधीतून डिजिटल क्लासरूमचे काम पूर्ण झाले आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या या सहकार्याबद्दल सदाशिव खाडे आणि त्यांच्या संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.

या नवीन डिजिटल वर्गखोलीमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी दिशा मिळणार असून, उद्याच्या भारताचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यात अशा शाळा मोलाचे योगदान देणार असल्याचा ठाम विश्वास मंत्री जयकुमार गोरेंनी यावेळी व्यक्त केला.

Pratap Sarnaik : मोठी बातमी! “महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी…”, मराठीसक्तीवरून परिवहन मंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

विद्यार्थ्यांना आधुनिक, गुणवत्तापूर्ण व तंत्रज्ञानाधारित शिक्षण देणे हा या डिजिटल क्लासरूम उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, अजून १५ लाखाचा निधी या शाळेसाठी उपलब्ध करणार असल्याचे सदाशिव खाडे यांनी यावेळी सांगितले.

अत्याधुनिक शैक्षणिक साधनसामग्री, स्मार्ट क्लासरूम, संगणकीय सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासोबतच आधुनिक एलईडी स्क्रीन बोर्डच्या उभारणीमुळे शिक्षण अधिक परिणामकारक, आकर्षक व सुलभ होणार आहे.

Sanjay Raut News: फडणवीसांच्या ‘त्या’ गर्जनेचे आता काय झाले? मराठी भाषा सक्तीवर

यावेळी मध्यप्रदेश इंदौर विभागीय आयुक्त सुदाम खाडे,सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई महेश शिंदे, सातारा जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, युवानेते विशाल बागल, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजयशेठ शितोळे सरकार, पंचायत समिती सभापती वनिता दुबळे, पंचायत समिती सदस्य हनमंत बोटे, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन मा .ए. खाडे,नाना पाटील, विनोद खाडे, चंचल बाळासाहेब खाडे, राणीताई खाडे, भगवान सानप, अमर खरमाटे, विजय हांगे, नितीन जगताप, महादेव जगताप, उपसरपंच प्रमिला खरमाटे, ओबीसी सेल मोर्चा उपाध्यक्ष बापूराव हांगे, माजी सरपंच  अंकुश खरमाटे, श्रीमंत ओंबासे, सरपंच किरण खाडे, धीरज खाडे, अधिक खरमाटे, नाथा खरमाटे , आकाराम खरमाटे ,मल्हारी खरमाटे ,जयकर खाडे, समीर पाटील, श्रीमंत खरमाटे, अर्जुन खाडे, संतोष ढोले, ज्ञानेश्वर खाडे , प्रथमेश खाडे, सौरभ नाकाडे, प्रीतम खाडे, मधुकर खाडे, मा.सरपंच पांडुरंग खाडे, श्रीरंग खाडे, कणसेवाडी गावचे उपसरपंच अनिल खाडे, राजेंद्र जाधव, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासह, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान श्री ब्राह्मचैतन्य फाउंडेशन च्या वतीने दि.गोपीनाथ मुंडे चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेचं उदघाटन ही मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मंत्री जया भाऊंनी तुफान फटकेबाजी करत फलंदाजी केली.

 

Web Title: Minister jaykumar gore inaugurates hi tech digital classroom at enkul zp school in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Jaykumar Gore

संबंधित बातम्या

वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य शासनाचे व्यापक नियोजन; मुख्यमंत्री फडवणीस यांची माहिती
1

वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य शासनाचे व्यापक नियोजन; मुख्यमंत्री फडवणीस यांची माहिती

Satara News: लिंब ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमिततेप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक
2

Satara News: लिंब ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमिततेप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.