Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील ४६ हजार विद्यार्थ्यांना मिळणार विद्यावेतनाचा पहिला हप्ता- मंत्री मंगल प्रभात लोढा

मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती दिली आहे. या योजनेतील ४६ हजार विद्यार्थ्यांना विद्यावेतनाचा पहिला हप्ता मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यामध्ये डीबीटी द्वारे हा हफ्ता थेट जमा केला जाणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 09, 2024 | 04:04 PM
फोटो सौजन्य- X

फोटो सौजन्य- X

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून सुरु असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी नाव नोंदणी केलेल्या आणि सध्या आस्थापनांच्या माध्यमातून इंटर्नशिप करत असलेल्या ४६ हजार विद्यार्थ्यांना विद्यावेतनाचा पहिला हप्ता मिळणार असल्याची माहिती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. सदर विद्यावेतन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT ( Direct benefit Transfer) मार्फत थेट जमा करण्यात येणार आहे. याकरिता राज्य सरकारकडून ४२ कोटी रुपये वितरित करण्यात येणार असल्याचे मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.

 ४६ हजार प्रशिक्षणार्थ्यांचे एकूण ४२ कोटी विद्यावेतन यावेळी दिले जाणार 

शासनामार्फत प्रशिक्षणार्थीच्या बँक खात्यात मासिक विद्यावेतन डीबीटीद्वारे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२४ या महिन्यामध्ये प्रशिक्षणासाठी रुजू होऊन प्रशिक्षण घेत असलेल्या ४६ हजार प्रशिक्षणार्थ्यांचे एकूण ४२ कोटी विद्यावेतन यावेळी अदा करण्यात येत आहे.

“मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण”

प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे युवकांना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या या योजनेचा महाराष्ट्रातील युवक मोठ्या प्रमाणावर लाभ घेत असल्याचे याप्रसंगी दिसून येते. रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध असूनही बेरोजगार उमेदवारांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसल्यामुळे रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त होण्यास अडचणी येत होत्या. यावर उपाययोजना म्हणून शासनाने “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” योजना सुरु केली.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे राज्यातील युवकांना उद्योजकांकडे ऑन जॉब ट्रेनिंग देऊन रोजगारक्षम करण्यात येईल व त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाअधिक संधी उपलब्ध होतील, हाच उद्देश ठेवण्यात आला आहे. या योजनेकरिता राज्य सरकारकडून ५५०० कोटी निधी मंजूर करण्यात आले आहेत.

८७ हजार १४९ प्रशिक्षणार्थी रुजू

९ ऑक्टोबर २०२४ रोजी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण ३ लाख ६९ हजार ७९८ प्रशिक्षणार्थीनी नोंदणी केली असून, १ लाख ७९ हजार ३१८ प्रशिक्षणार्थीना नियुक्ती देण्यात आली आहे. यामध्ये ८७ हजार १४९ प्रशिक्षणार्थी रुजू झाले असून, १०५८६ आस्थापनांनी याकरिता नोंदणी केली आहे.

Web Title: Minister mangal prabhat lodha informed 46 thousand students of the chief ministers youth work training scheme will get the first installment of education stipend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 04:04 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mangal Prabhat Lodha

संबंधित बातम्या

‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी
1

‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘AI’ प्रशिक्षण कार्यशाळा; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
2

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘AI’ प्रशिक्षण कार्यशाळा; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

Pratap Sarnaik : एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री आराखडा’ तयार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती…
3

Pratap Sarnaik : एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री आराखडा’ तयार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती…

पाईप तुटल्याने संभाजीनगरमध्ये कामात अडथळा! एमजेपीच्या सूत्रांनी दिली माहिती
4

पाईप तुटल्याने संभाजीनगरमध्ये कामात अडथळा! एमजेपीच्या सूत्रांनी दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.