Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महाविकास आघाडीची जिथे सत्ता, तिथे निधी नाही’; मंत्री नितेश राणे यांच्या विधानाने खळबळ

कोणाला गावाचा विकास करायचा असेल, तर इथे येऊन प्रवेश करून जा. भरघोस काम होतील, नाहीतर विकास होणार नाही. आपला कार्यक्रम सोपा आणि स्पष्ट असतो. आपण हातचे राखून ठेवत नाही, असे ते म्हणाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 14, 2025 | 09:14 AM
'महाविकास आघाडीची जिथे सत्ता, तिथे निधी नाही'; मंत्री नितेश राणे यांच्या विधानाने खळबळ

'महाविकास आघाडीची जिथे सत्ता, तिथे निधी नाही'; मंत्री नितेश राणे यांच्या विधानाने खळबळ

Follow Us
Follow Us:

कुडाळ : नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहणारे राज्याचे मत्स्य व्यवसाय विकासमंत्री नितेश राणे यांनी पुन्हा ‘त्या’ गावांना निधी देणार नसल्याचा इशारा दिला आहे. ‘ज्या गावांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे, महाविकास आघाडीचे सरपंच असतील, त्या गावांना एक रुपयाचाही निधी देणार नाही’, असा इशारा त्यांनी दिला आहे.

कुडाळमध्ये पार पडलेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे धक्कादायक विधान केले. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये तालुका कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी गावाचा विकास करायचा असेल, तर भाजपमध्ये प्रवेश करा, असे विधान केले. मी माझ्या लोकांना सांगितले आहे की, उबाठा आणि या विकास आघाडीचे अस्यक असलेल्या गावांची यादी काढा.

जिथे-जिथे उबाठा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, पदाधिकारी असतील, त्या गावात एका रुपयाचाही निधी देणार नाही. एवढे मी तुम्हाला आजच सांगतो. काहीच देणार नाही, असेही नितेश राणे यांनी सांगितले.

आपला बॉस खंबीर

महायुतीचा झेंडा दिसला नाही की, निधी बंद. बोंबलत बसू द्या माझ्या नावाने, काही फरक पडत नाही. आपला बॉस वरती खंबीर बसलेला आहे. मला काही चिंता नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

फक्त महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाच निधी मिळणार

कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना कॅबिनेट मंत्री नितेश राणे म्हणाले, मी तुम्हाला विश्वास देतो की, येणाऱ्या दिवसांत जिल्हा नियोजनचा निधी असेल, सरकारचा कुठलाही निधी असेल, तो फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना मिळेल. बाकी कोणालाही मिळणार नाही. कोणालाच मिळणार नाही.

विकास हवा असेल तर भाजपात प्रवेश करा

कोणाला गावाचा विकास करायचा असेल, तर इथे येऊन प्रवेश करून जा; भरघोस काम होतील, नाहीतर विकास होणार नाही. आपला कार्यक्रम सोपा आणि स्पष्ट असतो. आपण हातचे राखून ठेवत नाही, असे ते म्हणाले.

Web Title: Minister nitesh rane talked about development funds nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 09:14 AM

Topics:  

  • Mahaharashtra Politics
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

Sindhudurg News :सिंधुदुर्गात पाणीटंचाईची शक्यता; वाड्या-वस्त्यांपासून धरण लाभक्षेत्राबाहेरील गावांसाठी नितेश राणेंचे मोठे निर्देश
1

Sindhudurg News :सिंधुदुर्गात पाणीटंचाईची शक्यता; वाड्या-वस्त्यांपासून धरण लाभक्षेत्राबाहेरील गावांसाठी नितेश राणेंचे मोठे निर्देश

Nitesh Rane On Abhijeet Dipke : ‘शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही’; अभिजीत दिपकेंच्या आंदोलनावर नितेश राणेंचा घणाघात
2

Nitesh Rane On Abhijeet Dipke : ‘शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही’; अभिजीत दिपकेंच्या आंदोलनावर नितेश राणेंचा घणाघात

Maharashtra Drought : जालन्यात दुष्काळाचा मच्छीमारांना मोठा फटका; सोमठाणा तलावात मत्स्यउत्पादन २० टक्क्यांवर
3

Maharashtra Drought : जालन्यात दुष्काळाचा मच्छीमारांना मोठा फटका; सोमठाणा तलावात मत्स्यउत्पादन २० टक्क्यांवर

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं
4

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.