Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्री रवींद्र चव्हाणांचा डोंबिवलीत नवा उपक्रम! वीज बिलापासून होणार सुटका

पर्यावरणपूरक विजेचा स्त्रोत असलेल्या सोलार एनर्जी सिस्टीम नव्या इमारतीना बंधनकारक करण्यात आले आहे. तरीसुद्धा जुन्या इमारतीवर मात्र अशाप्रकारची सोलार प्रणाली नाही. इमारतीवर सोलर प्रणाली बसविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येत असल्याने सोसायटयांना हा खर्च परवडत नाही. यामुळेच या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्याच्या माध्यमातून सोसायटयांना ही प्रणाली मोफत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 07, 2024 | 05:21 PM
मंत्री रवींद्र चव्हाणांचा डोंबिवलीत नवा उपक्रम! वीज बिलापासून होणार सुटका
Follow Us
Follow Us:

कल्याण : वीज बिलाचा भार कमी करत पर्यावरण पूरक स्त्रोतापासून वीज निर्मिती करण्याच्या केंद्र सरकारच्या उपक्रमाचा पुरस्कार करताना डोंबिवलीतील गृहनिर्माण सोसायटयांना सोलर एनर्जी पॉवरची भेट देण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला आहे. पॉवर एनर्जी क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्याच्या मदतीने शहरातील गृहनिर्माण सोसायटयांना सोलर एनर्जी पॉवर सिस्टीम मोफत दिले जाणार असून याबाबतची माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली आहे. डोंबिवली पूर्वेकडील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला शहरातील ५०० पेक्षा जास्त सोसायट्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

पर्यावरणपूरक विजेचा स्त्रोत असलेल्या सोलार एनर्जी सिस्टीम नव्या इमारतीना बंधनकारक करण्यात आले आहे. तरीसुद्धा जुन्या इमारतीवर मात्र अशाप्रकारची सोलार प्रणाली नाही. शहरात अशा हजारो इमारती असून या इमारतींना लिफ्ट, पथदिवे, सामूहिक विजपुरवठा, पाण्याचा पंप यासाठी लागणाऱ्या विजेसाठी दरमहा ५० ते ६० हजार रुपयाचे बिल भरावे लागते. या इमारतीची या वीज खर्चातून सुटका करता यावी किंवा किमान वीज बिल निम्म्यापर्यत कमी करता यावे यासाठी शहरातील अशा सर्व इमारतीवर सोलर प्रणाली कार्यान्वित करत केंद्र सरकारचा सौर उर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून डोंबिवली शहर पहिली ग्रीन सिटी करण्याचा आपला मानस असल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

इमारतीवर सोलर प्रणाली बसविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येत असल्याने सोसायटयांना हा खर्च परवडत नाही. यामुळेच या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्याच्या माध्यमातून सोसायटयांना ही प्रणाली मोफत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर ही प्रणाली आपल्या सोसायट्यासाठी कार्यान्वित करून घेत वीज बिलाच्या रकमेतून जास्तीत जास्त सूट मिळवा त्याचबरोबर सामाजिक जबाबदारी म्हणून विजेची बचत करत सौर उर्जा वापरण्यासाठीच्या उपक्रमात आपला सहभाग नोंदवा असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीनंतर उपस्थित गृहसंकुलापैकी जवळपास ७० गृहसंकुलांनी ही प्रणाली बसविण्यासाठी आपण तयार असल्याचे समती पत्र दिले असून उर्वरित सोसायट्याशी संपर्क साधून हा उपक्रम त्यांच्यासाठी कसा फायद्याचा ठरेल याबाबत त्याना कंपन्याच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून पटवून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Minister ravindra chavan new initiative in dombivli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2024 | 05:21 PM

Topics:  

  • Minister Ravindra Chavan
  • thane

संबंधित बातम्या

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप
1

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप

Pratap Sarnaik : आदिवासी जमीन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट; अप्पर तहसीलदारांच्या निलंबनाची मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी
2

Pratap Sarnaik : आदिवासी जमीन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट; अप्पर तहसीलदारांच्या निलंबनाची मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी
3

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.