
ठाणे शहरात पक्षाची सातत्याने होत असलेली अधोगती आणि संघटनात्मक दुर्बलता यामुळे आपण कोणतीही आगामी निवडणूक न लढवण्याचा ठाम निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज फॉर्म भरण्याचा अंतिम दिवस असून अवघ्या काही तासात ही मुदत संपणार आहे. जागावाटपावरून शिंदे – भाजपा गटात एकीकडे राजकीय नाट्य रंगले असतानाच दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील जागावाटपांवरून देखील राजकीय नाट्य चांगलेच रंगल्याच चित्र पाहायला मिळत आहे.ठाण्यातील जेष्ठ आणि कडवट शिवसैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरेश मणेरा यांनी निवडणुकीतून केवळ बाहेरच न पडता राजकीय संन्यास घेतल्याचे सांगितल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दुसऱ्या पक्षात प्रवेश करून निष्ठा गमावण्यापेक्षा राजकारणातून बाजूला राहणे अधिक योग्य असल्याची भूमिका मणेरा यांनी मांडली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे ठाण्यातील ठाकरे गटाच्या नेतृत्वावर आणि भविष्यातील राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दीर्घकाळ पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या मणेरा यांच्या राजकीय संन्यासामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, ठाण्यात ठाकरे गटाची संघटनात्मक स्थिती अधिकच कमकुवत होत चालल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्या निर्णयाचे राजकीय पडसाद येत्या काळात स्पष्टपणे दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Ans: ठाण्यातील माजी उपमहापौर आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते नरेश मणेरा यांनी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
Ans: ठाणे शहरात ठाकरे गटाची सातत्याने होत असलेली अधोगती, संघटनात्मक दुर्बलता आ
Ans: दुसऱ्या पक्षात प्रवेश करून निष्ठा गमावण्यापेक्षा राजकारणातून पूर्णपणे बाजूला राहणे योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.