Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shambhuraj Desai: “जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून…”; मंत्री शंभुराज देसाईंचे स्पष्ट निर्देश

दरड प्रवण गावांमधील नागरिकांची राहण्याची सोय करावी. महामार्गावरील तुंबलेली गटारे खुली करावीत. तसेच रस्ते विकास महामंडळाने महामार्गावरील गस्त वाढवावी असे, शंभुराज देसाई म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 26, 2025 | 10:11 PM
Shambhuraj Desai: “जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून…”; मंत्री शंभुराज देसाईंचे स्पष्ट निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

सातारा:  मान्सून कालावधीत जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून प्रत्यक्ष क्षेत्रपातळीवर जाऊन काम करावे. काम करीत असताना नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात. मान्सून कालावधीत अति पावसामुळे कोणत्याही गावाचा संपर्क तुटल्यास संपर्क पुन्हा प्रस्थापित करुन देण्याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात मान्सूनपूर्व आढावा बैठक पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले,   पावसामुळे जिथे शेती पिकांचे, पशुधनाचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे पाऊस उघडताच गतीने सुरु करावे. या पंचनाम्यातून एकही बाधित मदतीपासून वंचित राहू नये.  दरड प्रवण गावांचे जीआयएस सर्व्हेक्षण झाले आहे. ज्या गावांचे स्थलांतर करण्याबाबत सांगितले आहे त्या गावांच्या स्थलांतरासाठी शासकीय जमिनीचा शोध घ्यावा.

मान्सून कालावधीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) एक पथक कोयनानगर येथे ठेवावे, असे निर्देश देऊन पालकमंत्री देसाई म्हणाले, शेंद्रे ते कागल रस्त्यांचे काम सुरु आहे. या कामाच्या अनुषंगाने सेवा रस्त्यावर ठेवलेली विविध यंत्रे काढून सेवा रस्त्यावरील वाहतूक विना अडथळा होईल याची दक्षता घ्यावी. सध्या पावसामुळे महामार्गावर पाणी येत आहे. यामुळे वाहतुक कोंडी होत आहे. महामार्गालगची गटारे साफ करावीत. वाहतुकीदरम्यान वाहनधारकांना कोणतीही अडचण होणार नाही याची रस्ते विकास महामंडळाने खबरदारी घ्यावी, असेही निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले.

मदत व पुनर्वसन मंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेती पिकांचे व पशुधनाचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी पंचनामे करावेत. ज्या गावांवर डोंगरातील दरडी पडत असतील तर अशा गावांमध्ये डोंगराच्या कडेला बांबू लागवड करावी. बांबू मुळे दरडी पडण्याचे प्रमाण खूप कमी असते. दरड प्रवण गावांचे जीआयएस सर्व्हेक्षण झाले असून आवश्यकतेप्रमाणे पुन्हा या गावांचे सर्व्हेक्षण करावे.

दरड प्रवण गावांमधील नागरिकांची राहण्याची सोय करावी. महामार्गावरील तुंबलेली गटारे खुली करावीत. तसेच रस्ते विकास महामंडळाने महामार्गावरील गस्त वाढवावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्रीभोसले यांनी बैठकीत केल्या.

महाबळेश्वरला अवकाळीने झोडपून काढले

सातारा: सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण ओळखले जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस तब्बल 346 मिलिमीटर झाला आहे. मान्सून आगमनाच्या आधीच पावसाने एकूण आकडेवारीची एक तृतीयांश सरासरी गाठल्याने पुढील तीन महिन्यात पाऊस किती बरसणार का अतिवृष्टीचा जलवा पाहायला मिळणार यामुळे बळीराजा धास्तावला आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या कामाची पावसामुळे उसंत मिळेनाशी झाली आहे.  सातारा जिल्ह्यात सरासरी 858.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Maharashtra Rain: महाबळेश्वरला अवकाळीने झोडपून काढले; तब्बल ३४६ मिलिमीटर तुफान पावसाची नोंद

26 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत हवामान खात्याचा अहवालानुसार महाबळेश्वर तालुक्यात तब्बल 346.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  गेल्या 24 तासात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे 78 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अवकाळीच्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर परिसरातील बेंडा नदी लिंगमळा धबधबा व इतर नाले उसंडून वाहत आहेत.  पर्यटकांच्या आकर्षण असलेले धबधबे पुन्हा एकदा सजीव झाल्याने थंडीच्या सरी धोके याचा अनुभव घेण्यासाठी महाबळेश्वर मध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत.

 

Web Title: Minister shambhuraj desai give instruction to satara administration about monsoon preparation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 10:05 PM

Topics:  

  • Maharashtra Weather
  • Satara News
  • Shambhuraj Desai

संबंधित बातम्या

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला
1

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला

Maharashtra Rain Alert:  महाराष्ट्रात पावसाचा कहर! धोका वाढला; काळाकुट्ट अंधार अन्…. , काही तास अत्यंत महत्वाचे
2

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पावसाचा कहर! धोका वाढला; काळाकुट्ट अंधार अन्…. , काही तास अत्यंत महत्वाचे

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; आरपीआयच्या आठवले गटाचा इशारा
3

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; आरपीआयच्या आठवले गटाचा इशारा

Maharashtra Rain: काही तास कोकणासाठी महत्वाचे! पाऊस असा कोसळणार की…; IMD चा ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट
4

Maharashtra Rain: काही तास कोकणासाठी महत्वाचे! पाऊस असा कोसळणार की…; IMD चा ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.