
gadchiroli news
नुकत्याच घडलेल्या कोठी-कोरणार पूल दुर्घटनेची गंभीर दखल घेत मंत्री महोदयांनी जिल्ह्यातील सर्व लहान-मोठ्या पुलांचे तात्काळ ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. गडचिरोलीतील लहान-मोठे पूल, नाले आणि ओढ्यांवरील पुलांच्या कायमस्वरूपी सुरक्षिततेसाठी स्वतंत्र ‘पूल पॅकेज’ मंजूर करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली जाईल, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले स्पष्ट केले.
जिल्ह्यातील विविध रस्ते, पूल, खनिज वाहतूक मार्गिका, आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकअंतर्गत सुरू असलेले प्रकल्प, पूर्ण झालेली विकासकामे आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांचा सखोल आढावा घेण्यात आला. अडपल्ली येथील ‘युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’साठी प्रस्तावित जागेची पाहणी करून प्रशासनाला सूचना दिल्या.
“विकासकामे केवळ कागदावर किंवा वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे नाही, तर ती दर्जेदार आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मजबूत असणे तितकेच गरजेचे आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांवर आणि हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”
– शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री)
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोलीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात वेग, गुणवत्ता आणि सुरक्षिततेचा पाठपुरावा करत जिल्ह्याचा कायापालट करण्याचा ठाम निर्धार मंत्री महोदयांनी या दौऱ्यादरम्यान व्यक्त केला.