
'मिसिंग लिंकवरील दरड कोसळलेल्या भागाची पाहणी केल्यानंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मोठे विधान (Photo Credit- Instagram)
घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहात अचानक बदल झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दगड व माती खाली आली. या घटनेत कनेक्टिंग लिंकच्या बोगद्याला कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. मात्र, एंट्री पॉईंट परिसरातील शोसाठी असलेल्या स्लॅबचा तसेच संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळून खाली पडण्याचा प्रकार घडला असल्याचे ते म्हणाले.
फडणवीसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; ‘त्या’ घटनेवरुन हर्षवर्धन सपकाळांची मागणी
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि दाट धुक्यामुळे डोंगराच्या माथ्यावर नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली आहे, याचे अचूक निरीक्षण करणे शक्य होत नाही. पाऊस ओसरल्यानंतर तज्ज्ञांकडून सविस्तर तांत्रिक पाहणी करण्यात येईल. पाण्याच्या प्रवाहात नेमका कशामुळे बदल झाला आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणत्या कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या लागतील, याबाबतचा निर्णय त्यानंतर घेतला जाईल.
दरम्यान, रस्त्यावर पडलेला स्लॅब व इतर मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या असल्याकजे त्यांनी स्पष्ट केले. रस्ता वाहतुकीसाठी सुरू करायचा अथवा नाही याबाबतचा अंतिम निर्णय पोलीस प्रशासन आणि एमएसआरडीसी यांच्या संयुक्त पाहणी व सुरक्षा मूल्यमापनानंतर घेतला जाईल. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व निर्णय घेतले जातील, असेही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.