Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“ते आमदार झाले तर भविष्यात…”; जतमधून उदय सामंत यांनी व्यक्त केला पडळकरांबद्दल विश्वास

जत तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी येथे उद्योग आले पाहिजेत म्हणून उमदीला एमआयडीसी करण्यासाठी गोपचंद यांनी धडपड केली, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 12, 2024 | 07:13 PM
"ते आमदार झाले तर भविष्यात..."; जतमधून उदय सामंत यांनी व्यक्त केला पडळकरांबद्दल विश्वास

"ते आमदार झाले तर भविष्यात..."; जतमधून उदय सामंत यांनी व्यक्त केला पडळकरांबद्दल विश्वास

Follow Us
Close
Follow Us:
जत: जत तालुक्यात विद्यमान आमदारांना साधे रस्ते सुद्धा करता आलेले नाहीत, मतदार संघ मागास ठेवला, असा आरोप उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला, तसेच जत तालुक्यातील उमदी येथे राज्यातील सर्वात कमी वेळेत मंजूरी मिळालेली एमआयडीसी असून याठिकाणी वर्षभरात पडळकर याना सोबत घेवून मोठ्या प्रकल्पाचे भूमिपूजन करू असा विश्वास ही उद्योगमंत्री  सामंत यांनी व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार गोपचंद पडळकर यांच्या समर्थनात उमदी येथे जाहीर सभा पार पडली. त्यावेळी मंत्री सामंत बोलत होते. यावेळी सदाभाऊ खोत,  गोपीचंद पडळकर, डॉ. रवींद्र आरळी, ब्रह्मानंद पडळकर हे प्रमुख उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले, जत तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी येथे उद्योग आले पाहिजेत म्हणून उमदीला एमआयडीसी करण्यासाठी गोपचंद यांनी धडपड केली. यामुळे राज्यातील कमी वेळात येथे एमआयडीसीला मंजुरी दिली. ते आमदार झाले तर भविष्यात मोठा प्रकल्प आणल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत. परिणामी येत्या वर्षभरात येथे पडळकर याना घेऊन येथे मोठ्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यासाठी मी येणार आहे.  यापपूर्वीही मी जतला आलो होतो. त्यावेळी विस्तारित योजनेसाठी आणि कालव्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे आली होती. गोपचंद पडळकर यांनी पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ हजार कोटी रुपये दिले. येथील मतदारांचा उत्साह पहिला तर गोपचंद पडळकर निश्चित आमदार होतील असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केली.

बारामतीतून बॅगा पाठवल्या जात आहेत: सदाभाऊ खोत

गोपीचंद पडळकर नावाचा गाव गाड्यातला  आमदार झाल्यानंतर मंत्री होणार म्हणून त्यांना पाडण्यासाठी राज्यातील यंत्रणा कामाला लागली आहे. यासाठी बारामतीतून बॅगा पाठविल्या जात असल्याचा आरोप करून सदाभाऊ खोत म्हणाले पडलकरांना हरविण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. काही लोक क्लिपा व्हाययरल करीत आहेत पण त्याचा उपयोग होणार नाही. कारण लोकांनी पडळकर याना विधानसभेत पाठविण्याचे ठरविले आहे. पडळकर बाहेरुन आला आहे, असा आरोप काहीजण करीत आहेत त्यांनी आधी सोनिया गांधी कुटून आल्या हे आधी सांगावे. माझी आणि गोपीचंदची सर्जा राजाची जोडी आहे. मी अजून सहा वर्षे आमदार आहे. गोपचंदही आमदार होणार आहेत. पाच वर्षात जतचा कायापालट करू. लाडकी बहीण योजने विरोधात कोर्टात गेलेले लोक आता आपल्या जाहीरनाम्यात बहिणींना तीन हजार रुपये देण्याची घोषणा करतात अशा फसव्या माणसावर विश्वास ठेवू नका.

गोपीचंद पडळकर म्हणाले, निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून, उमदी येथील एमआयडीसी मंजुरीवरून विरोधक गैरसमज पसरवीत आहेत. उद्योगमंत्र्यांनी इथे येऊन स्वतः सांगितलं. आता विरोधकांना झोप लागणार नाही. तालुक्यातील गोरगरीब लोकांना गाड्या पसिंगसाठी सांगलीला जावे लागते त्यामुळे त्यांच्यासाठी सरकारकडे प्रादेशिक परिवहन विभागाचे उपविभाग एम. एच. ५८ जतला झालं पाहिजे, यासाठी पाठपुरावा करणार आहे. यासाठी पूर्व भागासाठी स्वतंत्र एस टी बस डेपो मंजूर करण्यासाठीही प्रयत्न करू. आता बारावीपर्यंत शाळेत जाण्यासाठी मुलींचा पास मोफत आहे तो पदवीधर पर्यंत होण्यासाठी पाठपुरावा करू.

Web Title: Minister uday samant election rally for mahayuti candidate gopichand padalkar in jat sangli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 07:09 PM

Topics:  

  • gopichand padalkar
  • Maharashtra Assembly election 2024
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Sharad Pawar News: पडळकरांना भिडला, तुरूंगात गेला….; शरद पवारांनी त्यालाच दिली मोठी जबाबदारी
1

Sharad Pawar News: पडळकरांना भिडला, तुरूंगात गेला….; शरद पवारांनी त्यालाच दिली मोठी जबाबदारी

Kokan Politics: महायुतीत मिठाचा खडा; कोकणात शिंदे गटाच्या दोन नेत्यांकडून स्वबळाची घोषणा
2

Kokan Politics: महायुतीत मिठाचा खडा; कोकणात शिंदे गटाच्या दोन नेत्यांकडून स्वबळाची घोषणा

Uday Samant : विद्यापीठात महाराजांच्या युद्धनितीवर अभ्यासक्रम सुरु होणार, उदय सामंत यांची माहिती
3

Uday Samant : विद्यापीठात महाराजांच्या युद्धनितीवर अभ्यासक्रम सुरु होणार, उदय सामंत यांची माहिती

एकेकाळी विधिमंडळात शिस्त होती, पण आता…; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
4

एकेकाळी विधिमंडळात शिस्त होती, पण आता…; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.