Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shiv Sena : दिवाळीचा फराळ शेतकऱ्यांसोबत; एकनाथ शिंदेंपासून मंत्र्यांपर्यंत बांधावर जाणार, उदय सामंत यांची माहिती

Shiv Sena : शिवसेना यंदाची दिवाळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत साजरी करणार आहे. एकनाथ शिंदे जालन्यात, तर उदय सामंत नांदेडमधील सायाळ येथे शेतकऱ्यांसोबत फराळ करणार आहेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 08, 2026 | 04:37 PM
Shiv Sena : दिवाळीचा फराळ शेतकऱ्यांसोबत; एकनाथ शिंदेंपासून मंत्र्यांपर्यंत बांधावर जाणार, उदय सामंत यांची माहिती

Shiv Sena : दिवाळीचा फराळ शेतकऱ्यांसोबत; एकनाथ शिंदेंपासून मंत्र्यांपर्यंत बांधावर जाणार, उदय सामंत यांची माहिती

Follow Us
Follow Us:
  • राज्यभरातील मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर
  • उदय सामंत नांदेडला जाणार
  • साडेसात लाख शेतकरी कुटुंबांपर्यंत शिधावाटप
 

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांसोबत यंदाची दिवाळी साजरी करण्याचा निर्णय शिवसेनेने (Shiv Sena) घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे मंत्री आणि पदाधिकारी राज्यातील विविध दुष्काळग्रस्त भागांत जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा फराळ करणार आहेत. यंदा शेतकरी हेच आमचे कुटुंब आहे, अशी भावना शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी व्यक्त केली.

दिवाळीच्या सणात आपण आपल्या कुटुंबासोबत आनंद साजरा करत असताना संकटात असलेल्या शेतकरी बांधवांच्या दुःखात सहभागी होणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. केवळ आर्थिक मदत देऊन जबाबदारी संपत नाही, तर संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांना मानसिक आधार देणेही महत्त्वाचे आहे. याच भावनेतून शिवसेनेने हा निर्णय घेतल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

उदय सामंत नांदेडला जाणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. तर उदय सामंत स्वतः नांदेड जिल्ह्यातील सायाळ येथे शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळीचा फराळ करणार आहेत.

Mumbai Fire: “आगीचे लोळ अन् लोकांमध्ये प्रचंड दहशत!” प्रभादेवी परिसरात भीषण दुर्घटनेने उडाली खळबळ; अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल!

राज्यभरातील मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर

शिवसेनेचे विविध मंत्री राज्यातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जाऊन शेतकरी कुटुंबांची भेट घेणार आहेत. त्यांचे नियोजित दौरे पुढीलप्रमाणे :

 गुलाबराव पाटील – पोखरी तांडा, जळगाव
प्रताप सरनाईक – पानखंडा, धाराशिव
 दादा भुसे – मालेगाव
संजय शिरसाट – शिंदोण तांडा, छत्रपती संभाजीनगर
शंभूराज देसाई – खटाव, सातारा
प्रकाश आबिटकर – आटपाडी, उंबरगाव, सांगली
भरत गोगावले – भोर, पुणे
संजय राठोड – मंगरूळ, यवतमाळ
योगेश कदम – पालघर
आशिष जयस्वाल – कोलिथमारा, नागपूर

Mumbai News: लक्ष्मीपूजनासाठी फुलांना मोठी मागणी; दादरच्या फूल बाजारात १.५ कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज

साडेसात लाख शेतकरी कुटुंबांपर्यंत शिधावाटप

शिवसेनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे सात ते साडेसात लाख शेतकरी कुटुंबांपर्यंत शिधावाटप पोहोचवण्यात आले आहे. आणखी चार ते पाच लाख शेतकरी कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवण्याचा संकल्प असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

तसेच दुष्काळग्रस्त भागांमध्ये पाण्याची उपलब्धता सुलभ व्हावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ट्रॅक्टरला जोडता येणारे दोन ते अडीच हजार लिटर क्षमतेचे टँकर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणे हा केवळ एक दिवसाचा दौरा किंवा औपचारिक उपक्रम नाही. दिवाळी संपली म्हणून शेतकऱ्यांप्रती असलेली जबाबदारी संपणार नाही. शासनाच्या माध्यमातून मदतकार्य सुरूच राहील आणि शिवसेनेचे सामाजिक कार्यही पुढे सुरू राहील, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

दरवर्षी आपण आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतो; मात्र यंदा शेतकरी हेच आमचे कुटुंब आहे. संकटात असलेला प्रत्येक शेतकरी महायुती सरकारसाठी महत्त्वाचा आहे. त्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासोबत फराळ करणे आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हीच यंदाच्या दिवाळीची खरी भावना असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिवसेना यंदाची दिवाळी कोणासोबत साजरी करणार आहे?

    Ans: शिवसेना यंदाची दिवाळी राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांसोबत साजरी करणार आहे.

  • Que: उदय सामंत दिवाळी कुठे साजरी करणार आहेत?

    Ans: उदय सामंत नांदेड जिल्ह्यातील सायाळ येथे शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.

  • Que: एकनाथ शिंदे दिवाळी कुठे साजरी करणार आहेत?

    Ans: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.

Web Title: Shiv sena diwali farmers uday samant eknath shinde rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Rohit Pawar : ‘सरकारचं डोकं सटकलंय, भाजपसोबत जास्त काळ राहू नका!’ एकनाथ शिंदेंना रोहित पवारांचा अप्रत्यक्ष सल्ला
1

Rohit Pawar : ‘सरकारचं डोकं सटकलंय, भाजपसोबत जास्त काळ राहू नका!’ एकनाथ शिंदेंना रोहित पवारांचा अप्रत्यक्ष सल्ला

एकनाथ शिंदेंकडून तांड्यावरील नागरिकांना दिवाळीची भेट; स्वखर्चातून आनंदाचा शिधा वाटप
2

एकनाथ शिंदेंकडून तांड्यावरील नागरिकांना दिवाळीची भेट; स्वखर्चातून आनंदाचा शिधा वाटप

Devendra Fadnavis on Gokul milk: गोकुळ वादात फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट! ‘शिंदे-पवारांच्या संमतीनेच…
3

Devendra Fadnavis on Gokul milk: गोकुळ वादात फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट! ‘शिंदे-पवारांच्या संमतीनेच…

BDD Chawl Redevelopment : बीडीडी चाळ पुनर्विकासाला गती; घरांचा दर्जा आणि सुविधांशी तडजोड नाही – एकनाथ शिंदे
4

BDD Chawl Redevelopment : बीडीडी चाळ पुनर्विकासाला गती; घरांचा दर्जा आणि सुविधांशी तडजोड नाही – एकनाथ शिंदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.