Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांना मोठा धक्का?, ‘या’ आमदाराने घेतली शरद पवारांची भेट

माढ्याचे आमदार बबनदादा शिंदेही अजित पवारांना धक्का देण्याची शक्यता आहे. आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहचले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 04, 2024 | 04:31 PM
अजित पवारांना मोठा धक्का?, ‘या’ आमदाराने घेतली शरद पवारांची भेट
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी अजित पवार गटाला पुन्हा एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवारांची साथ सोडली. तसेच इंदापुरमधील प्रवीण माने यांनीही अजित पवारांची साथ सोडली. आता माढ्याचे आमदार बबनदादा शिंदेही अजित पवारांना धक्का देण्याची शक्यता आहे. आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहचले आहेत. पुण्यातील मोदी बाग इथं बबनदादा शिंदे आणि रणजितसिंह शिंदे पोहोचले आहेत. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

शरद पवार हे सध्या पुण्यातील मोदी बागेमध्ये आहेत. या ठिकाणी अनेकजण शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. अशातच माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजिससिंह शिंदे शरद पवार यांना भेटण्यासाठी आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमुळं अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय. कारण आमदार बबनराव शिंदे शरद पवार गटात घरवापसी करणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे माढा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर त्यांच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू धनराज शिंदे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांनी काही दिवसापूर्वी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली होती. तर आमदार बबदादा शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी रोहित पवार यांचे वडिल राजेद्र पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. दरम्यान, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून कोणाला तिकीट मिळणार? याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Web Title: Mla of ajit pawar group met sharad pawar nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2024 | 04:31 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Election
  • Madha

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : देगलूरमध्ये राजकीय उलथापालथ; अजितदादांच्या अकाली निधनामुळे कार्यकर्ते निराधार
1

Maharashtra Politics : देगलूरमध्ये राजकीय उलथापालथ; अजितदादांच्या अकाली निधनामुळे कार्यकर्ते निराधार

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार; काँग्रेसही उमेदवार देणार?
2

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार; काँग्रेसही उमेदवार देणार?

Baramati By Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही; ‘या’ नेत्याने केला तीव्र विरोध
3

Baramati By Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही; ‘या’ नेत्याने केला तीव्र विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.