Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लाडकी बहीण’नंतर आता लाडका शेतकरी योजना लागू करा; ‘या’ आमदाराने केली मागणी

 सततच्या पावसाने त्रस्त झालेले धारणी, चिखलदरा, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सूर्जी, चांदूरबाजार, तिवसा, भातकुली, अमरावती तालुक्यातील गावागावातील नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली. यावेळी या संततधार पावसाने जिल्ह्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटाने हिरावून घेतला आहे व शेतात पाणी साठले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 06, 2024 | 01:00 PM
लाडका शेतकरी योजना लागू करा राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

लाडका शेतकरी योजना लागू करा राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच पसंतीस उतरली आहे. महिलांचा या योजनेला मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यानंतर आता शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी. तसेच लाडकी बहिणी योजनेच्या धर्तीवर लाडका शेतकरी योजनाही सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे.

हेदेखील वाचा : आमची मम्मी पप्पांचा पूर्ण पगार घेऊन त्यांचं ऐकत नाही आणि इथे सरकारला वाटतंय 1500 रुपयांत त्यांचं ऐकेल… चिमुकलीचा Video Viral

आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. सततच्या पावसाने त्रस्त झालेले धारणी, चिखलदरा, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सूर्जी, चांदूरबाजार, तिवसा, भातकुली, अमरावती तालुक्यातील गावागावातील नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली. यावेळी या संततधार पावसाने जिल्ह्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटाने हिरावून घेतला आहे व शेतात पाणी साठले आहे.

सण उत्सावांच्या दिवसांत आपण कसे जगावे हा प्रश्न बळीराजापुढे निर्माण झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी सरकारने ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी यावेळी केली.

लाडका शेतकरी योजना सुरु करावी

शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ‘लाडका शेतकरी’ योजना सुरू करावी, अशी मागणी सुद्धा करण्यात आली. शेतकऱ्यांनी धीर धरावा, खचून जाऊ नये, सरकार खंबीरपणे पाठीशी उभे राहील, असा विश्वास यावेळी शेतकऱ्यांना देऊन राणा यांनी मदत मिळवून देण्याचे अभिवचन दिले.

हेदेखील वाचा : आधी ‘लाडकी बहीण योजने’ला विरोध! निवडणूक जवळ येताच काँग्रेसने दिले ‘हे’ मोठे आश्वासन

Web Title: Mla ravi rana demanded to implement ladka shetkari yojana nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 01:00 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • MLA Ravi Rana

संबंधित बातम्या

Ladki Soon Abhiyan : महायुती सरकारचा निवडणूकीसाठी नवा डाव? बहिणीनंतर आता “लाडकी सून अभियान’ सुरु
1

Ladki Soon Abhiyan : महायुती सरकारचा निवडणूकीसाठी नवा डाव? बहिणीनंतर आता “लाडकी सून अभियान’ सुरु

‘राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थी महिलांवर…’; आदिती तटकरेंचं मोठं विधान
2

‘राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थी महिलांवर…’; आदिती तटकरेंचं मोठं विधान

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….
3

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….

…तर तुम्हीही लाडकी बहीण योजनेतून होऊ शकता बाद; गडचिरोलीत 25 हजार महिला ठरल्या अपात्र
4

…तर तुम्हीही लाडकी बहीण योजनेतून होऊ शकता बाद; गडचिरोलीत 25 हजार महिला ठरल्या अपात्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.