सध्या मुख्यमंत्र्यांअंतर्गत सुरु केलेली लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यभर मोठ्या चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत 12 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात येणार असल्याचे आवाहन सरकरने केले आहे. विधानसभा निवडणुका जवळ येत आहे. आता सरकारच्या या योजनेचा लाभ घेत महिला खरंच या नेत्यांना निवडून आणणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या योजनेसंदर्भात अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या यासंदर्भातील एका चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे.
या व्हिडिओमध्ये ही चिमुकली 1500 रुपये दिल्यानंतर सुद्धा महिला सरकारच काहीही ऐकणार नाही असे सांगताना दिसून येत आहे. व्हिडिओत चिमुकली काय सांगते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तिचा हा व्हायरल व्हिडिओ एकदा पाहावा लागेल. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांना आता हा व्हिडिओ चांगलाच आवडल्याचे दिसून येत आहे.
हेदेखील वाचा – Teachers Day: आपल्या अंतिम क्षणातही शिक्षक मुलांचा अभ्यास चेक करत राहिला अन्… ह्रदयद्रावक Video पाहून अनेकांना अश्रू अनावर
हा व्हायरल व्हिडिओ @queenkiyu30 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या लाडकी बहीण योजना.. असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओ पाहून अनेकजण आता यावर आपले मत व्यक्त करत आहे. अनेक लोकांना आता हा व्हिडिओ फार आवडला असून लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. व्हिडिओमध्ये चिमुकली बोलते, “आमची मम्मी पप्पांचा पूर्ण पगार घेऊन त्यांचं काहीही ऐकत नाही आणि इथे सरकारला वाटतंय की 1500 मध्ये त्यांचं ऐकेल… कठीण आहे …”
हेदेखील वाचा – पाकिस्तान ते पाकिस्तानच! उद्घाटन होताच लोकांनी लुटला मॉल, तासाभरात बिसनेसमॅन झाला कंगाल, Video Viral
व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट्स करत यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका युजरने लिहिले आहे, “अरे बाळा बस कस….सरकार परेंत व्हिडिओ पोचला तर…1500 बंद होईल…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे ती मुलगी शिकवलेला विनोद करते आहे तो विनोद म्हणून घ्या उगाच तिला शहाणपणा नका शिकवू….”