Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची अधिकाऱ्यांसोबत आमदार रोहित पवारांकडून पाहणी

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विशेष प्रयत्नातून सुरू असलेल्या नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह आमदार रोहित पवार यांनी नुकतीच केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 11, 2022 | 04:13 PM
मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची अधिकाऱ्यांसोबत आमदार रोहित पवारांकडून पाहणी
Follow Us
Close
Follow Us:

जामखेड : कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विशेष प्रयत्नातून सुरू असलेल्या नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह आमदार रोहित पवार यांनी नुकतीच केली. यावेळी कामाच्या बाबतीत त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या व सध्या सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली.

या महामार्गाबाबत लागणारा पाठपुरावा व मंजुरीसाठीचे सर्वतोपरी प्रयत्न आमदार रोहित पवार यांनी सतत केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केले होते. दिल्लीत जाऊन गडकरी यांच्या भेटी देखील या विषयासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी घेतल्या होत्या. तसेच या महामार्गाचा फायदा हा फक्त त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांना होणार नसून नगर जिल्ह्यातील इतरही तालुके व सोलापूर जिल्ह्याला देखील या महामार्गाचा फायदा होणार आहे. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन समिती, नॅशनल हायवेचे अधिकारी यांच्यासोबत आमदार रोहित पवार यांनी बैठका घेऊन वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

काही महिन्यांपूर्वी नगर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कर्जत जामखेड मतदारसंघातील श्रीगोंदा-जामखेड व नगर-सोलापूर या प्रमुख राष्ट्रीय महामार्गांसह जिल्ह्यातील ४०७५ कोटी ₹ खर्चाच्या २५ मार्गाचं भूमिपूजन झालं होतं. विशेष म्हणजे आमदार रोहितपवारांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी १४०० कोटी हे त्यावेळी कर्जत जामखेड मतदारसंघातील रस्त्यांसाठी दिलेच शिवाय जामखेड-सौताडा या नवीन रस्त्याचीही त्यांनी घोषणा केली होती. त्यासाठी देखील आता 157 कोटींचा निधी मंजूर झाला असून त्याचेही काम सुरू आहे.

[read_also content=”साखर उत्पादनात महाराष्ट्राची भरारी, विक्रमी १३२ लाख टन उत्पादन; साखर आयुक्तांचा दावा https://www.navarashtra.com/maharashtra/maharashtras-record-in-sugar-production-record-production-of-132-lakh-tonnes-sugar-commissioners-claim-nrdm-267404.html”]

आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्याने मतदारसंघात अनेक महत्वाचे रस्ते मंजूर झाले असून त्यापैकी बहुतांश रस्त्याचे काम सुरू देखील झाले आहे. मतदारसंघातील रस्त्याच्या बॅकलॉग भरून काढण्यासाठी लागणारे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आमदार रोहित पवार यांनी बोलून दाखवले. विविध विकास कामांसाठी आमदार रोहित पवार हे सतत झटत असतात. तसेच ते वैयक्तिकरित्या सर्व गोष्टींकडे विशेष लक्ष देऊन असतात. त्यामुळेच मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न निकाली लागत आहेत.

Web Title: Mla rohit pawar inspects the work of national highways passing through the constituency nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2022 | 04:13 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Karjat Jamkhed
  • MLA Rohit Pawar
  • Nitin Gadkari

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.