Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जनतेच्या अडचणी समजल्या पाहिजेत; आमदार सुनील शेळके यांचा ‘जनता दरबार’

वडगाव मावळमध्ये आमदार सुनील शेळके यांनी जनता दरबारचे आयोजन केले होते. यामध्ये त्यांनी जनतेच्या प्रश्नांचे आणि समस्यांचे निराकरण केले. त्यावेळी जनतेचा मोठा उत्साह होता.

  • By प्रीति माने
Updated On: May 05, 2025 | 05:59 PM
MLA Sunil Shelke Janata Darbar to solve the problems of the people Vadgaon Maval News

MLA Sunil Shelke Janata Darbar to solve the problems of the people Vadgaon Maval News

Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ : “जनतेशी थेट संवाद आणि त्यांच्या अडचणींचे त्वरित निराकरण हेच खरे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले आहे. आमदार सुनील शेळके यांचा जनता दरबार उपक्रम पार पडवा आहे. यासाठी मतदारसंघातील नागरिकांच्या भरघोस उपस्थिती लावल्यामुळे हा यशस्वी उपक्रम ठरला आहे.

वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात आमदार सुनील शेळके यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. या  जनता दरबारात आमदार सुनील शेळके यांनी विविध समस्या घेऊन आलेल्या नागरिकांचे सविस्तर ऐकून घेतले. मागील साडेपाच वर्षांप्रमाणे दर सोमवारी होणाऱ्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रलंबित शासकीय कामे, शैक्षणिक व आरोग्य विषयक अडचणी, योजनांचा लाभ, रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधा यासंबंधी अनेक तक्रारी व सूचना नागरिकांनी मांडल्या.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

दरबारात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष दीपाली गराडे, दीपक हुलावळे, साहेबराव कारके, काळूराम मालपोटे, पंढरीनाथ ढोरे, नारायण ठाकर, नारायण भालेराव, भरत येवले, सुहास गरुड, चंद्रकांत दाभाडे आणि किशोर सातकर हे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेत कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधला.

यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, “आपल्याकडून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जनतेच्या अडचणी समजल्या पाहिजेत. त्या ऐकून घेऊन तत्काळ निर्णय घेणे आणि प्रशासनाला कामासाठी भाग पाडणे, हीच खरी जबाबदारी आहे. जनता दरबार उपक्रमातून लोकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळते, त्यातूनच परिवर्तनाची दिशा ठरते.”

महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

वडगाव व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडल्यामुळे जनता दरबाराला पुन्हा एकदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार शेळके यांच्या कार्यपद्धतीमुळे मावळ तालुक्यात लोकांमध्ये विश्वास व समाधान व्यक्त होत आहे.

अज्ञात व्यक्तींविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

वडगाव मावळमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. तुमच्या पतीचा खून झाला आहे. तसेच तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे, असे सांगून एका महिलेकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. ही घटना 16 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील जाधववाडी, नवलाख उंबरे येथे घडली. याबाबत पीडित महिलेने शनिवारी (दि. 26) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी या आपल्या घरी होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर अज्ञात आरोपीने फोन केला. फिर्यादी यांचे पती पंडित रामचंद्र जाधव यांचा खून झाला असून तुमच्या आणि तुमच्या मुलाच्याही जीवाला धोका आहे, असे म्हणत फिर्यादी महिलेकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच फिर्यादीस व फिर्यादीच्या कुटुंबीयांना धोका असल्याचे धमकी दिली. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Mla sunil shelke janata darbar to solve the problems of the people vadgaon maval news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 05:59 PM

Topics:  

  • maval news
  • Sunil Shelke
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान
1

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

वडगाव नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध; हरकती नोंदविण्याचे मुख्याधिकाऱ्यांच्या आवाहन
2

वडगाव नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध; हरकती नोंदविण्याचे मुख्याधिकाऱ्यांच्या आवाहन

Maharashtra Rain Alert : पवना धरण परिसरात मुसळधार पाऊसाची जोरदार बॅटिंग; पवना धरण 100 टक्के भरले
3

Maharashtra Rain Alert : पवना धरण परिसरात मुसळधार पाऊसाची जोरदार बॅटिंग; पवना धरण 100 टक्के भरले

Crime News : मावळात वाढली दादागिरी! सरपंचाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी
4

Crime News : मावळात वाढली दादागिरी! सरपंचाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.