पौडमधील मंदिराची विटंबना केल्याप्रकरणावरुन चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : पुण्यातील पौड येथे लांजनास्पद प्रकार घडला आहे. पहलगाम हल्ल्यामुळे वातावरण तापलेले असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुळशी तालुक्यातील पौड येथील नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना झाल्याची घटना समोर आली असून, यामुळे गावात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे नोंदवली गेली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप आमदार चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.
पौडमधील शिवमंदिरातील या प्रकारामुळे राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी शिवाजी वाघवले (रा. पौड) यांनी पौड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी एका मुस्लिम युवकासह त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चाँद नौशाद शेख (वय 19, रा. पौड) हा युवक नागेश्वर मंदिरात आला आणि त्याने अन्नपूर्णा देवीची मूर्ती मंदिरातून खाली उतरवून तिची विटंबना केली. या प्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी अगदी काही शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, “पौड गावातील अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात एका तरुणाने गैरकृत्य केल्याचे समोर आले आहे. ही घटना अतिशय घृणास्पद आणि संतापजनक आहे. कोणतीही संवेदनशील व्यक्ती हे कदापि सहन करणे शक्य नाही. माझी शासनाला विनंती आहे की कृपया या तरुणावर तातडीने कठोरात कठोर कारवाई करावी. सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला माफी मिळता कामा नये, अशी आमची भूमिका आहे,” असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. यामुळे मात्र आमदार चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सुप्रिया सुळे यांनी पुणे ग्रामीण पोलिसांकडे कारवाईची मागणी केली असली तरी पोस्टमध्ये आरोपीचे नाव न घेतल्यामुळे चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. चित्रा वाघ यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “काय हो 12मतीचा मोठ्या ताई…एरवी तुम्ही प्रचंड संवेदनशील आहात असा आव आणता…अगदी रशीया युक्रेन युध्दावर तुम्ही तावातावाने मतं मांडता पण तुमच्या मतदारसंघात म्हणजे मुळशी तालुक्यातील पौड गावात जो घृणास्पद आणि संतापजनक प्रकार घडला त्यावर चार ओळींचे ट्विट टाकून गप्प आहात… ?” असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, “त्या हरामखोरानं नागेश्वर मंदिरात घुसून अन्नपूर्णा मातेवरवर अतिप्रसंग केला नाही, तर समस्त हिंदू महिलांना एक चेतावणी दिली आहे. हे तुम्हाला कळलं असेलच… पण तरीही त्या नीच आणि विकृत चाँद शेखचे तुम्ही नावही घेत नाही? तुष्टीकरणाचं राजकारण सुचतंय का..? तुमच्या मतदार संघात दहशतवादी वृत्तीची ही पिल्लावळ आहे… त्यांच्या आणि पहलगाव मधल्या दहशतवाद्यांमध्ये काडीचाही फरक नाही… त्या विकृत लांडग्यांना देवाभाऊ चांगलीच अद्दल शिकवतीलच पण तुम्हाला मात्र समस्त हिंदू समाज कधीही माफ करू शकणार नाही,’ अशा कडक शब्दांत आमदार चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय हो 12मतीचा मोठ्या ताई एरवी तुम्ही प्रचंड संवेदनशील आहात असा आव आणता…अगदी रशीया युक्रेन युध्दावर तुम्ही तावातावाने मतं मांडता पण तुमच्या मतदारसंघात म्हणजे मुळशी तालुक्यातील पौड गावात जो घृणास्पद आणि संतापजनक प्रकार घडला त्यावर चार ओळींचे ट्विट टाकून गप्प आहात… ? त्या… — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 5, 2025