Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidhan parishad Election 2026: निवडणुकीची रणधुमाळी सुरू! दोन दिवसांत १८ अर्जांची विक्री, मात्र अधिकृत अर्ज अद्याप शून्य

विधान परिषद निवडणुकीतील एकूण ६१६ मतदारांपैकी भाजपकडे ३०७ मते आहेत. विजयासाठी ३०८ मतांची आवश्यकता असल्याने भाजपला केवळ एका अतिरिक्त मताची गरज आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 26, 2026 | 05:30 PM
Congress releases candidates list for Vidhan Parishad Election 2026,

Congress releases candidates list for Vidhan Parishad Election 2026,

Follow Us
Follow Us:
  • सोलापुरात राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज खरेदी
  • सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत अर्ज विक्रीत वाढ
  • अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ येत असल्याने इच्छुकांकडून हालचाली वाढल्या
Vidhan parishad Election 2026:  स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी सोलापुरात राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल १८ अर्जांची विक्री झाली असून विविध पक्षांतील इच्छुकांसह अपक्ष उमेदवारांनीही निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र अद्याप एकाही उमेदवाराने अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.

निवडणूक शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत अर्ज विक्रीत वाढ झाली. सोमवार, २६ मे रोजी एकूण ४ अर्जांची विक्री झाली. त्यामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसच्या एका इच्छुकाने दोन अर्ज खरेदी केले, तर दोन अपक्ष इच्छुकांनी प्रत्येकी एक अर्ज घेतला.

Monsoon Update : मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी अपडेट; केरळमध्ये प्रवेश लांबला, ‘या’ तारखेला होऊ शकते दमदार सुरुवात

मंगळवारीही अर्ज विक्रीचा वेग कायम राहिला. काँग्रेसच्या एका इच्छुकाने पुन्हा दोन अर्ज घेतल्याने पक्षांतर्गत स्पर्धा वाढल्याची चर्चा रंगू लागली आहे. पर्यायी व्यवस्था किंवा तांत्रिक कारणांसाठी एकाच उमेदवाराकडून दोन अर्ज खरेदी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. याशिवाय दोन अपक्ष इच्छुकांनीही प्रत्येकी एक अर्ज घेतल्याने निवडणुकीत अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ येत असल्याने इच्छुकांकडून हालचाली वाढल्या आहेत. प्रमुख राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी निश्चितीबाबत अद्याप संभ्रम कायम असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि अस्वस्थता दोन्ही वातावरण दिसून येत आहे.

 

Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंचे मोठे ‘राजकीय धक्कातंत्र’; आणखी एक पक्ष थेट शिंदेसेनेत विलीन होणार?

भाजपमध्ये उमेदवारीवरून चर्चांना उधाण

विधान परिषद निवडणुकीतील एकूण ६१६ मतदारांपैकी भाजपकडे ३०७ मते आहेत. विजयासाठी ३०८ मतांची आवश्यकता असल्याने भाजपला केवळ एका अतिरिक्त मताची गरज आहे. महापालिका, जिल्हा परिषद-पंचायत समिती आणि नगरपरिषदांमधील संख्याबळ पाहता भाजपची स्थिती मजबूत मानली जात असली तरी उमेदवाराच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. भाजपकडून माजी आमदार राम सातपुते, प्रशांत परिचारक, राजन पाटील, रणजीतसिंह मोहिते पाटील, राजेंद्र राऊत तसेच माजी जिल्हाध्यक्ष शहाजीभाऊ पवार यांची नावे चर्चेत आहेत. पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी देणार याकडे कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपकडे संख्याबळ असले तरी उमेदवार निवडीत सावध भूमिका घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. अनेक इच्छुकांकडून पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग सुरू असून मुंबई-दिल्ली दौरेही वाढल्याची चर्चा आहे.

 

काँग्रेससमोर गणितांचे संकट

दुसरीकडे काँग्रेसकडे या निवडणुकीत केवळ ९६ मते आहेत. त्यामुळे स्वबळावर विजय मिळवणे काँग्रेससाठी जवळपास अशक्य मानले जात आहे. मित्रपक्षांची मदत मिळाली तरी विजयाची खात्री नसल्याने काँग्रेसचे राजकीय गणित गुंतागुंतीचे बनले आहे. काँग्रेसकडून उमेदवारीबाबत अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आलेली नसली तरी काही इच्छुकांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि मतांची अपुरी संख्या यामुळे काँग्रेस नेतृत्व सावध पवित्र्यात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अर्ज विक्री वाढत असल्याने येत्या काही दिवसांत राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांची संख्या वाढल्यास निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

 

Web Title: Mlc election news 2026 congress candidates solapur mlc nomination

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक
1

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी
2

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमधील महापूर, मराठा आरक्षण आणि शेअर बाजारातील अस्थिरता
3

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमधील महापूर, मराठा आरक्षण आणि शेअर बाजारातील अस्थिरता

Satara Politics: ‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल
4

Satara Politics: ‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.