Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Milind Deora News: 2029 मध्ये वरळीचा आमदार बदलायचा; मिलिंद देवरांचा रोख कुणाकडे?

शिवसेना (शिंदे गट)चे खासदार मिलिंद देवरा यांनी 2029 मध्ये वरळीचा आमदार बदलणार असल्याचे वक्तव्य केले. सचिन अहिर यांच्या कार्यक्रमातील या विधानामुळे आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघाबाबत राजकीय चर्चांना वेग आला.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 15, 2026 | 09:58 AM
Milind Deora, Aditya Thackeray, Sachin Ahir, Worli,

Milind Deora, Aditya Thackeray, Sachin Ahir, Worli,

Follow Us
Follow Us:
  • 2029 सालाच्या निवडणुकीत नक्कीच बदल होणार
  • सचिन अहिर आणि आमचे संबंध खूप जुने
  • आदित्य ठाकरे वरळीचे आमदार
 

Mumbai Politics: “येत्या 2029 सालाच्या निवडणुकीत नक्कीच बदल होणार आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातल्या आमदारांना आपण रिटायर करायचं आहे,” अशा अप्रत्यक्ष शब्दांत शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी खळबळजनक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा रोख ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे असल्याची चर्चा राजकारणात सुरू झाली आहे.

‘2029 मध्ये नक्कीच बदल होणार’

कार्यक्रमात बोलताना मिलिंद देवरा म्हणाले की, “आज येथे जमलेली गर्दी पाहून 2029 मध्ये नक्कीच बदल होणार, असा विश्वास वाटतो. बदल म्हणजे वरळीचा आमदार बदलणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळे सर्वसामान्य वरळीकरांना फायदा होईल,” असा विश्वास व्यक्त केला.

Jayant Patil On Fadnavis Meeting: ‘मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तटकरे-पटेल यांच्यासोबत

सचिन अहिर यांच्या नेतृत्वाचे कौतुक

मिलिंद देवरा यांनी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांचेही कौतुक करतना देवरा म्हणाले की, “सचिन अहिर यांनी माझे वडील, माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांच्यासोबतही काम केले आहे. आमचे संबंध खूप जुने आहेत. आज आम्ही एकाच पक्षात आहोत, याचा आनंद आहे. सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली वरळीकरांना न्याय मिळेल. विधान परिषदेचे उपसभापती हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

राजकीय चर्चांना उधाण

दरम्यान, सचिन अहिर यांनी अलीकडेच शिंदे गटामध्ये प्रवेश केला असून त्यानंतर त्यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर मिलिंद देवरा यांच्या वक्तव्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघातील भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत चर्चांना वेग आला आहे.

सचिन अहिर यांचाही आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा

दरम्यान, शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर वरळीतील पहिल्याच जाहीर सभेत विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. वरळीच्या राजकारणावर भाष्य करताना त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर भर देत आगामी निवडणुकांबाबतही सूचक विधान केले.

यावेळी त्यांनी कोणाचेही नाव न घेता, “काही लोकांनी वरळीचा सातबारा आपल्या नावावर केल्यासारखे वागणे सुरू केले आहे. लोकांना गृहीत धरले जात आहे,” अशी टीका केली. त्यांच्या या वक्तव्याचा रोख आदित्य ठाकरे यांच्याकडे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Rain Update : देशातील ‘या’ 13 राज्यांसाठी पुढील 8 तास महत्त्वाचे; मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

आदित्य ठाकरे आणि सचिन अहिर यांची

सचिन अहिर हे केवळ शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेतेच नव्हते, तर मुंबईतील, विशेषतः वरळी भागातील आदित्य ठाकरे यांच्या राजकारणातील एक प्रमुख रणनीतिकार म्हणूनही ओळखले जात होते. जेव्हा आदित्य ठाकरे यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली, तेव्हा वरळीची संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी अहिर यांच्याकडे देण्यात आली होती. त्यावेळी अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. राजकीय विश्लेषकांच्या मते, अहिर यांच्या जाण्यामुळे वरळीतील आदित्य ठाकरे यांच्या राजकीय प्रभावावर परिणाम होऊ शकतो.

 

 

 

 

 

Web Title: Milind deora statement worli mla aditya thackeray retirement 2029 assembly elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 08:51 AM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • Maharashtra Politics
  • Milind Deora
  • Mumbai News
  • Sachin Ahir
  • Shiv Sena
  • worli

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
2

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
3

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
4

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.