Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jayant Patil On Fadnavis Meeting: ‘मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तटकरे-पटेल यांच्यासोबत बैठक’? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले

 देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी झालेल्या भेटीबाबत जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. इस्लामपूर नगराध्यक्ष अपात्र प्रकरणासाठी भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यासोबत बैठक झाल्याच्या चर्चांही त्यांनी फेटाळून लावल्या.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 15, 2026 | 08:55 AM
Jayant Patil, Devendra Fadnavis, NCP SP, Maharashtra Politics

Jayant Patil, Devendra Fadnavis, NCP SP, Maharashtra Politics

Follow Us
Follow Us:
  • जयंत पाटील, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
  • या भेटीसंदर्भात आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया
  • सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हेदेखील तिथे उपस्थित होते, याची मला कोणतीही माहिती नव्हती,”
Jayant Patil On Fadnavis Meeting:   राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांही रंगल्या होत्या. अशातच या भेटीसंदर्भात आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

सुत्रांच्या हवाल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत या तीनही नेत्यांनी जवळपास सव्वा तास चर्चा केल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांची स्वतंत्र बैठक झाल्याचाही दावा करण्यात आला होता. मात्र, या दाव्यांवर जयंत पाटील यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावत ‘तटकरे आणि पटेल यांच्यासोबत माझी बैठक झाली नाही’ असं म्हटलं आहे.

Maharashtra Politics: अजित पवारांच्या पक्षापेक्षा थेट भाजप…! शरद पवारांची राष्ट्रवादी NDA च्या दिशेने? पडद्यामागे मोठ्या हालचाली

एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “माझी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यासोबत कोणतीही बैठक झालेली नाही. माझ्या भेटीचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना अपात्र ठरविण्यात आल्याच्या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी ते ‘वर्षा’ निवासस्थानी गेले होते.

‘मुख्यमंत्र्यांसोबत अवघी पाच मिनिटे चर्चा’

मी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ‘वर्षा’ निवासस्थानी पोहोचलो आणि सुमारे पाच मिनिटे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पावणेअकराच्या सुमारास तेथून बाहेर पडलो. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हेदेखील तिथे उपस्थित होते, याची मला कोणतीही माहिती नव्हती,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोठी बातमी ! फडणवीसांच्या ‘वर्षा’वर भाजप कोअर कमिटीची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा ?

दरम्यान, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असले, तरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

 

 

Web Title: Maharashtra politics jayant patil clarification meeting cm devendra fadnavis prafull patel sunil tatkare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 08:06 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • jayant patil
  • Maharashtra Politics
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
2

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन
4

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.