Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या मागणीसाठी कोल्हापुरात मनसे आक्रमक; निदर्शने करत आंदोलन

त्ताधारी आणि विरोधक यांनी संगनमताने जाणीवपूर्वक खंडपीठाचा खेळ चालवलेला आहे. आजचे विरोधक-पूर्वीचे सत्ताधारी होते. पूर्वीचे सत्ताधारी-आजचे विरोधक आहेत. विरोधात असताना केवळ घोषणाबाजी करायची.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 21, 2025 | 03:15 PM
उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या मागणीसाठी कोल्हापुरात मनसे आक्रमक

उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या मागणीसाठी कोल्हापुरात मनसे आक्रमक

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : ऐतिहासिक कोल्हापूरमध्ये बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरमध्ये होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर शहर व जिल्हातर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौकामध्ये खंडपीठ होण्यासंदर्भात घोषणा देऊन निदर्शने करत आंदोलन करण्यात आले.

हेदेखील वाचा : विक्रम गायकवाड हत्येप्रकरणी एसआयटीची स्थापना; पोलीस अधीक्षकांची माहिती; रामदास आठवले घेणार पीडित कुटुंबियांची भेट

खंडपीठाच्या मागणीसाठी दसरा चौकामध्ये आमरण उपोषणास बसलेले पदवीधर मित्र माणिक पाटील चुयेकर यांना यावेळी मनसे कोल्हापूरतर्फे पाठिंबा दर्शवण्यात आला. याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी वकील संघटना, कृती समितीसह, कोल्हापूर शहरातील सर्व तालीम, संस्था, संघटना व मंडळे यांना एकत्रित घेऊन आयआरबीसारखे मोठे आंदोलन उभा करून कोणतेही परिस्थितीमध्ये खंडपीठाचे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला.

शहराध्यक्ष प्रसाद पाटील तीव्र शब्दांत व्यक्त होताना म्हणाले की, ‘सत्ताधारी आणि विरोधक यांनी संगनमताने जाणीवपूर्वक खंडपीठाचा खेळ चालवलेला आहे. आजचे विरोधक-पूर्वीचे सत्ताधारी होते. पूर्वीचे सत्ताधारी-आजचे विरोधक आहेत. विरोधात असताना केवळ घोषणाबाजी करायची. मात्र, सत्तेत बसल्यानंतर या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करून कोल्हापूरच्या जनतेवर महाराष्ट्र शासन जाणीवपूर्वक अन्याय अत्याचार करत आहे. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या खंडपीठासाठी ३०० कोटी रुपये जाहीर केले होते, ते कुठे गेले असा प्रश्न उपस्थित केला.

पालकमंत्र्यांनी देखील या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित प्रश्न न सोडवल्यास याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे कोल्हापूरतर्फे देण्यात आला. जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांचे नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील, निलेश धुम्मा, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजीत राऊत, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

हेदेखील वाचा : SSC Board Exam राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची उद्यापासून बोर्डाची परीक्षा; परीक्षेचा पॅटर्न सोपा, उत्तीर्णांची संख्या वाढणार?

Web Title: Mns aggressive in kolhapur demanding high court bench nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 03:15 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Mumbai High Court

संबंधित बातम्या

Kolhapur News: कोल्हापुरात हिंसाचार; दोन गटातील वादामुळे दगडफेक, नेमकं झालं काय?
1

Kolhapur News: कोल्हापुरात हिंसाचार; दोन गटातील वादामुळे दगडफेक, नेमकं झालं काय?

Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली
2

Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प; मुसळधार पावसाचा बसला फटका
3

पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प; मुसळधार पावसाचा बसला फटका

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित
4

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.