Rahul Patil leaves Congress joins NCP Ajit Pawar group Kolhapur Political News
Maharashtra Political News : कोल्हापूर : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण रंगलं आहे. अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश होत असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोल्हापूरमध्ये देखील राजकीय वातावरण रंगले आहे. कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत राहुल पाटील हे लवकरच महायुतीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये राहुल पाटील यांचा पक्षप्रवेश होत असून याबाबत त्यांनी स्वतः पुष्टी केली.
महायुतीमधील राष्ट्रवादी गटात प्रवेश करत असलो तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आम्ही प्रवेश करताना एक अट ठेवूनच पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २५ ऑगस्ट रोजी करवीरमधील सडोली खालसा येथे पक्षप्रवेश होणार आहे .पण आमदार चंद्रदीप नरके ही आमचे राजकीय पारंपरिक विरोधक राहतील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था इतर निवडणुकीत ते आमचे विरोधकच असतील. करवीर विधानसभा मतदारसंघात आम्ही केवळ राष्ट्रवादी आणि पी. एन.पाटील गट म्हणूनच निवडणूक लढवू अशी घोषणा दिवंगत आमदार पी. एन .पाटील यांचे पुत्र कोल्हापूर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भोगावती कारखाना संदर्भात आम्ही कर्जासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी गेलो त्यावेळी आम्हाला पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांना विचारात घेत प्रशासकीय, पोलीस, विविध कार्यालय या ठिकाणी आडवणूक होत असल्याचे लक्षात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्या भेटीतच कर्ज देण्याची ग्वाही दिल्याने पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्टीकरण राहुल पाटील यांनी पक्षप्रवशाला दुजोरा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीला आता आठ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या काळात अनेक आव्हाने समोर येत आहेत. राजकीय तशीच सहकारातील आव्हानांमुळे नेते ,कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत .पी.एन पाटील काळात त्यांचा दोन वेळा पराभव झाला. पण त्यांच्या पाठीमागे विलासराव देशमुख यांच्यासारखे नेते होते. त्यावेळेस सामान्य जनतेला फारशी झळ बसली नाही. पण आजची राजकीय परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे आम्हाला काही निर्णय घ्यावे लागले असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कुठलाही निर्णय घेत असताना कार्यकर्त्यांना विचारात घेतल्याशिवाय निर्णय घेत नाही कार्यकर्त्यांचा विचार मी करत वेगळ्या वाटेवरून जाण्यासंदर्भातील सूचना मांडल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. आजच्या पत्रकार परिषदेस राजेश पाटील, बाळासाहेब खाडे, बी. एच. पाटील, शिवाजी पाटी, शंकरराव पाटील, भारत पाटील भुयेकर, हंबीराव वळके, शिवाजी कवठेकर, संदीप पाटील, शिवाजी आडनाईक, शिवाजी कारंडे, चेतन पाटील, रामचंद्र भोगम आदी उपस्थित होते.