'एकदा सत्ता द्या, कायद्याची भीती काय असते ते दाखवतो'; राज ठाकरे यांचं विधान
यवतमाळ : कोलकातानंतर बदलापूर, लातूर, पुणे यांसारख्या महाराष्ट्रातील शहरांमध्ये अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनेनंतर जनतेमध्ये संतापाची प्रचंड लाट उसळली आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ‘एकदा सत्ता द्या, कायद्याची भीती काय असते ते दाखवतो’, असे ते म्हणाले. ‘बदलापूरची घटना आमच्या महिला मनसैनिकाने उघडकीस आणली’, असेही त्यांनी सांगितले.
हेदेखील वाचा: सायकलमुळे प्रायव्हेट पार्टला जखमा, बदलापुरातील मुख्यध्यापकाचा संतापजनक दावा
राज ठाकरे हे सध्या यवतमाळच्या दौऱ्यावर असून, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहे. त्यावर वणी येथून बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘एकदा सत्ता द्या, कायद्याची काय भीती असते ते दाखवतो. बदलापूर येथील घटना आमच्या महिला मनसैनिकाने उघडकीस आणली आहे. पोलिसांना 48 तास दिले तर मुंबई ‘साफ’ ठेवतील’. असे म्हणत यवतमाळच्या दौऱ्याबाबत ते म्हणाले, उमेदवारांच्या चाचपणीसाठी हा दौरा आहे. त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्र, कोकणातही जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे 200-225 उमेदवार उभे करणार आहे.
गडचिरोलीचाही केला दौरा
22 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गडचिरोलीत आले. ठाकरे यांचा नियोजित कार्यक्रम सकाळी 11 वाजता होता. मात्र ते 12.30 वाजता पोहोचले. जेथे नगरच्या सर्किट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी केवळ अर्धा तास चर्चा कार्यकर्त्यांशी केली. तसेच निष्क्रिय कार्यकर्त्यांना खडसावत त्यांना पदावरून दूर करण्याचा इशारा दिल्याची माहितीही मिळत आहे.
हेदेखील वाचा: महाराष्ट्रातील पोलिसांवर केंद्रीय गृहमंत्र्यांचा विश्वास नाही; असं का म्हणाले संजय राऊत?