Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बावधन-कोथरूड प्रभागात बाराशे मतदारांची दुबार नावे, मनसेचा दावा; जिल्हाधिकाऱ्यांकडे केली ‘ही’ मागणी

बावधन-कोथरूड प्रभागातील मतदार याद्यांमध्ये तब्बल बाराशेहून अधिक मतदारांची नावे दुबार असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस बाळा शेडगे यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 16, 2025 | 06:07 PM
बावधन-कोथरूड प्रभागात बाराशे मतदारांची दुबार नावे, मनसेचा दावा; जिल्हाधिकाऱ्यांकडे केली 'ही' मागणी

बावधन-कोथरूड प्रभागात बाराशे मतदारांची दुबार नावे, मनसेचा दावा; जिल्हाधिकाऱ्यांकडे केली 'ही' मागणी

Follow Us
Close
Follow Us:
  • बावधन-कोथरूड प्रभागात बाराशे मतदारांची दुबार नावे
  • मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार
  • दुबार नावे रद्द करण्याची मनसेची मागणी

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. सर्व राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. सर्व राजकीय पक्षाच्या नेते नागरिकांच्या भेटीही घेत आहेत. अशातच आता बावधन-कोथरूड प्रभागातील मतदार याद्यांमध्ये तब्बल बाराशेहून अधिक मतदारांची नावे दुबार असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस बाळा शेडगे यांनी केला आहे. पक्षाच्या वतीने मतदार यादीची पडताळणी केल्यानंतर ही माहिती समोर आली असून, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन दुबार नावे रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती शेडगे यांनी दिली.

शेडगे यांनी सांगितले, बावधन-कोथरूड प्रभागात एकूण १,१५८ मतदारांची नावे दोन ते तीन वेळा यादीत आढळली आहेत. काही प्रकरणांमध्ये मतदाराचे नाव, फोटो आणि ओळखपत्र क्रमांक एकसारखे असून, पत्त्यात केवळ लहान बदल करून वेगवेगळ्या मतदारसंघात नाव नोंदवले गेले आहे. या नोंदींमध्ये एका सनदी अधिकाऱ्याचे नावही दुबार असल्याचे आढळले.

शेडगे पुढे म्हणाले, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पडताळणी करताना आम्ही सारखी नावे आणि फोटो ओळखले. मात्र, दुबार नावे वारंवार मतदानावेळी समस्यांना कारणीभूत ठरतात. प्रत्येक निवडणुकीत तक्रारी नोंदवल्या जातात, पण त्या निवारणाविना राहतात. त्यामुळे प्रशासनाने तातडीने ही दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली.

पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेचे कामगार सेना उपाध्यक्ष नरेंद्र तांबोळी, कोथरूड विभाग सचिव राजेंद्र वेडे पाटील, शहर संघटक प्रशांत मते, शहर सचिव संजय भोसले, उपविभाग अध्यक्ष महेश लाड आणि रमेश जाधव उपस्थित होते.

Web Title: Mns has made serious allegations regarding the voter list in bavdhan kothrud ward

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 06:07 PM

Topics:  

  • Election News
  • Kothrud News
  • MNS Chief Raj Thackeray

संबंधित बातम्या

संजय राऊतांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्यानंतर हर्षवर्धन सपकाळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
1

संजय राऊतांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्यानंतर हर्षवर्धन सपकाळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

इंडिया आघाडीत जर कोणत्या पक्षाला सहभागी व्हायचे असेल तर…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
2

इंडिया आघाडीत जर कोणत्या पक्षाला सहभागी व्हायचे असेल तर…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत काँग्रेसची भूमिका काय? ‘या’ बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं
3

मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत काँग्रेसची भूमिका काय? ‘या’ बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

Politics News : स्वबळावर की एकत्र लढायचं? महायुतीच्या बड्या नेत्यांची भूमिका जाहीर
4

Politics News : स्वबळावर की एकत्र लढायचं? महायुतीच्या बड्या नेत्यांची भूमिका जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.