Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गावातील उमेदवारांना नाकारून राष्ट्रवादीला दिले विक्रमी मताधिक्य; कोऱ्हाळेकरांची आवडत्या नेत्याला अनोखी श्रद्धांजली

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे व कोऱ्हाळे बुद्रुक गावाचे भावनिक ऋणानुबंध होते, त्यामुळे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडत कोऱ्हाळेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना उच्चांकी मताधिक्य दिले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 13, 2026 | 02:52 PM
गावातील उमेदवारांना नाकारून राष्ट्रवादीला दिले विक्रमी मताधिक्य; कोऱ्हाळेकरांची आवडत्या नेत्याला अनोखी श्रद्धांजली

गावातील उमेदवारांना नाकारून राष्ट्रवादीला दिले विक्रमी मताधिक्य; कोऱ्हाळेकरांची आवडत्या नेत्याला अनोखी श्रद्धांजली

Follow Us
Close
Follow Us:
  • राष्ट्रवादीला दिले विक्रमी मताधिक्य
  • गावातील उमेदवारांना नागरिकांनी नाकारले
  • कोऱ्हाळेकरांची आवडत्या नेत्याला अनोखी श्रद्धांजली
सोमेश्वरनगर : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे व कोऱ्हाळे बुद्रुक गावाचे भावनिक ऋणानुबंध होते. अजितदादांच्या राजकारणातील प्रवेशालाही कोऱ्हाळे बुद्रुक येथील ज्येष्ठ नेते सतीश खोमणे कारणीभूत होते. त्यामुळे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडत कोऱ्हाळेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना उच्चांकी मताधिक्य दिले. अजितदादांच्या निधनानंतर कोऱ्हाळे बुद्रुक तसेच माळशिकारेवाडी येथील ग्रामस्थांनी शोकसभा घेत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत गावातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुमारे ९० टक्के मतदान झाले.

 

विशेष म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी भारतीय जनता पक्षाने कोऱ्हाळे बुद्रुक गावातीलच उमेदवार दिले होते. त्यांना नाकारून राष्ट्रवादीला गावाने रेकॉर्डब्रेक मताधिक्य दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहिणी कदम ढोले यांना ३०७२ पैकी २७४६ इतकी विक्रमी मते मिळाली. ही मते एकूण मतांच्या ९० टक्के होती. भाजपच्या गावातीलच उमेदवार आरती मधुकर लोखंडे यांना केवळ १८५ मते मिळाली तर बहुजन समाज पक्षाच्या उमेदवार अश्विनी खोमणे यांना १०० तर शिवसेनेच्या उमेदवार गाडे यांना ४४ मते मिळाली.

दोन्ही उमेदवारांना विक्रमी मताधिक्य

पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र पवार यांना ३०७२ पैकी २६०६ ही उच्चांकी मते मिळाली. ही मतांची टक्केवारी एकूण मतांच्या ८५ टक्के होती. तर त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे स्थानिक उमेदवार बापूराव फणसे यांना २२९ मतांवर समाधान मानावे लागले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असिफ शेख यांना ८१ तर ठाकरे सेनेचे उमेदवार राकेश गायकवाड यांना ४० मते मिळाली. बहुजन समाज पार्टीचे दयानंद पिसाळ यांनाही केवळ ७२ मते मिळवता आली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गावातील असतानाही कोऱ्हाळेकरांनी त्यांना साफ नाकारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना विक्रमी मताधिक्य दिले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामधील हे सर्वाधिक मताधिक्य होते. गावातील मतदानाची टक्केवारी घटली असतानाही इतक्या प्रचंड प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान देऊन कोऱ्हाळेकरांनी एक प्रकारे आपल्या आवडत्या नेत्याला मतांच्या रूपाने श्रद्धांजली अर्पण केल्याचे या निकालावरून स्पष्ट होते.

हे सुद्धा वाचा : अजितदादांची प्रचंड आठवण, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादा न्याय देऊन गेले; अमोल बालवडकर भावूक

होम टू होम प्रचार

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रदीप धापटे, सोमेश्वर चे माजी संचालक शेखर खंडागळे, युवा नेते रवींद्र खोमणे, दत्तात्रय माळशिकारे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गडकरी, मोहन भगत, प्रवीण खोमणे, मुगुटराव भगत, दत्तात्रय भगत, संतोष साबळे, प्रताप धापटे यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांनी होम टू होम प्रचार करत मताधिक्य वाढण्यासाठी मेहनत घेतली.

Web Title: Citizens of korhale budruk village have given a record number of votes to ncp candidates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • Election News
  • Election Result

संबंधित बातम्या

Pune Politics: पुणे जिल्ह्याचा १०३२ कोटींचा विकास आराखडा मंजूर; सुनेत्रा पवारांचे मोठे प्रकल्प राबवण्याचे निर्देश
1

Pune Politics: पुणे जिल्ह्याचा १०३२ कोटींचा विकास आराखडा मंजूर; सुनेत्रा पवारांचे मोठे प्रकल्प राबवण्याचे निर्देश

अजितदादांची प्रचंड आठवण, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादा न्याय देऊन गेले; अमोल बालवडकर भावूक
2

अजितदादांची प्रचंड आठवण, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादा न्याय देऊन गेले; अमोल बालवडकर भावूक

केंद्रात अन् राज्यात ‘हिरो’, बारामतीत मात्र ‘झिरो’; स्थानिक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
3

केंद्रात अन् राज्यात ‘हिरो’, बारामतीत मात्र ‘झिरो’; स्थानिक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

माण-खटाव मतदारसंघात प्रभाकर देशमुखांचा जयकुमार गोरेंना धक्का; 5 गटांवर राष्ट्रवादीचा विजय
4

माण-खटाव मतदारसंघात प्रभाकर देशमुखांचा जयकुमार गोरेंना धक्का; 5 गटांवर राष्ट्रवादीचा विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.