Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MNS Alliance : ‘एकनाथ शिंदेंमुळेच मनसेची महायुतीसोबतची मैत्री फिस्कटली’; शिवसेनेनेही दिला इशारा

भाजपशी मैत्रीचे संबंध असूनही एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मनसेला महायुतीत सहभागी होता आलं नाही, असा सूर आवळण्यात आला. मनसेच्या बैठकीतच नवा खुलासा झाल्यामुळे शिंदे यांची शिवसेना आणि मनसे आमने-सामने आले आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 07, 2025 | 09:43 PM
'एकनाथ शिंदेंमुळेच मनसेची महायुतीसोबतची मैत्री फिस्कटली'; शिवसेनेनेही दिला इशारा

'एकनाथ शिंदेंमुळेच मनसेची महायुतीसोबतची मैत्री फिस्कटली'; शिवसेनेनेही दिला इशारा

Follow Us
Close
Follow Us:

Mumbai News : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक पार पडली. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी भाजपशी मैत्रीचे संबंध असूनही एकनाथ शिंदे यांच्या नकार घंटेवरमुळेच मनसेला महायुतीत सहभागी होता आलं नाही, असा सूर आवळण्यात आला. मनसेच्या बैठकीतच नवा खुलासा झाल्यामुळे शिंदे यांची शिवसेना आणि मनसे निवडणुकीआधी आमने-सामने आले आहेत.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला का? स्वत: च दिलं उत्तर, पंकजा मुंडेंनीही दिली माहिती

राज ठाकरे यांनी मात्र जे झालं, ते विसरा आणि निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश दिला आहे.

लोकसभेपाठोपाठ राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे यांची मनसे महायुतीत सहभागी होणार अशी जोरदार चर्चा झाल्या. राज ठाकरे यांनी लोकसभेत महायुतीचा प्रचारही केला होता. मात्र अद्यापही मनसेची महायुतीत एन्ट्री झालेली नाही. अमित ठाकरे यांच्याविरोधातही शिंदेंनी उमेदवार दिला होता. दरम्यान मनसेचा महायुतीतील सहभाग फक्त एकनाथ शिंदे यांच्यामुळेच होऊ शकला नाही, असा आरोप आता करण्यात आला आहे. मनसेनं लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला त्यावेळी धनुष्यबाण चिन्हाची ऑफर देण्यात आली होती. ती ऑफर राज ठाकरे यांनी धुडकवली होती. मनसे आणि भाजप यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असताना एकनाथ शिंदे यांच्यामुळे युती होऊ शकली नाही, असा दावा देखील करण्यात आला.

दरम्यान आज मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या दीड तास बैठकीत महापालिका निवडणुकांच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी महायुतीसोबत जायचं की एकला चलोची भूमीका घ्यायची यावरही चर्चा झाली. तर याबाबत एक कमिटी तयार करण्यावर एक मत झाले असून या कमिटीशी युती करायच्या वेळी चर्चा केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. पण आता याच मुद्द्यावरून राज्याचे राजकीय वातावरण गरम झालं असून शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका नेत्याने मनसेला थेट इशारा दिला आहे.

Sanjay Raut : वाल्मिक कराडसोबत मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्री; संजय राऊतांनी फोटो शेअर करत डागली तोफ

मनसेच्या नेत्यांच्या आरोपांनंतर शिवसेना नेते आमदार योगेश कदम यांनी मनसे नेत्यांच्या आरोपावरून थेट इशारा दिला आहे. शिंदे यांना दोष देणार असाल तर आम्ही ऐकून घेणार नाही. विधानसभेत उलट मनसेमुळेच आमचे दहा आमदार पडले आहेत, दावा देखील कदम यांनी केला आहे.

Web Title: Mns leaders allegations on deputy cm eknath shinde shiv sena in alliance with mahayuti in vidhan sabha election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 09:41 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • Mahayuti
  • MNS Leader Raj Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: निवडणुकीत महायुती म्हणून लढणार? CM फडणवीसांचे विधान चर्चेत; म्हणाले…
1

Maharashtra Politics: निवडणुकीत महायुती म्हणून लढणार? CM फडणवीसांचे विधान चर्चेत; म्हणाले…

Local Body Election 2025: राज्यातील ‘मिनी विधानसभा’ निवडणुकांसाठी महायुती सज्ज;  इलेक्शनसाठी  नऊ महत्त्वाचे टार्गेट
2

Local Body Election 2025: राज्यातील ‘मिनी विधानसभा’ निवडणुकांसाठी महायुती सज्ज;  इलेक्शनसाठी  नऊ महत्त्वाचे टार्गेट

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर
3

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
4

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.