Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जावं, राज्याची धुरा एकनाथ शिंदेंकडे सोपवा; बच्चू कडूंचं वक्तव्य

आमदार बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जाऊन देशाचं नेतृत्व करावं, तर महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदेंना मिळावं अशी भूमिका मांडली. यासोबतच त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावरही जोरदार पलटवार केला.

  • By विवेक
Updated On: Jul 11, 2026 | 05:12 PM
देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जावं, राज्याची धुरा एकनाथ शिंदेंकडे सोपवा; बच्चू कडूंचं वक्तव्य

देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जावं, राज्याची धुरा एकनाथ शिंदेंकडे सोपवा; बच्चू कडूंचं वक्तव्य

Follow Us
Follow Us:
  • देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जाऊन देशाचं नेतृत्व करावं, राज्याची धुरा एकनाथ शिंदेंकडे द्यावी, अशी बच्चू कडूंची मागणी
  • संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंनी ‘भविष्यवाणी कधीच खरी ठरत नाही’ म्हणत लगावला टोला
  • बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांच्या मालकांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचीही बच्चू कडूंनी केली मागणी
 

राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. केंद्रात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी संभाव्य पावले उचलली जात असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठे मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अश्यातच, शिवसेना (शिंदे गट) समर्थक आमदार बच्चू कडू यांनी याबाबत भूमिका मांडताना मोठं विधान केलं आहे. नागपुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन देशाचं नेतृत्व करावं आणि त्यांच्या अनुपस्थितीत महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवावं, अशी मागणी केली.

बच्चू कडू म्हणाले की, “महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला राज्यातील नेता देशाचं नेतृत्व करताना पाहायचा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळेच महाराष्ट्रात भाजप पुन्हा सत्तेत आली. त्यामुळे केवळ संख्याबळ नव्हे तर नैतिकतेच्या आधारावर फडणवीस दिल्लीला गेल्यास मुख्यमंत्रीपद शिंदेंनाच मिळायला हवे.”

‘देशात देवा भाऊ, महाराष्ट्रात शिंदे साहेब’

बच्चू कडू म्हणाले, “देवा भाऊंनी निश्चितच दिल्लीची तयारी करावी आणि देशाची सूत्रे हाती घ्यावीत. महाराष्ट्रात शिंदे साहेबांनी नेतृत्व करावं. देशात देवा भाऊ आणि महाराष्ट्रात शिंदे साहेब असा प्रवास झाला पाहिजे.”

‘आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी’; पक्षांतराच्या अफवांवर सुप्रिया सुळे संतापल्या

संजय राऊतांवर निशाणा

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस केंद्रात गेल्यास चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, असे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की, “संजय राऊत यांची भविष्यवाणी कधीच खरी ठरलेली नाही. त्यांनी कोणत्या ज्योतिषाकडे हात दाखवला आणि तो ज्योतिष कोणत्या पक्षाचा आहे, हे तपासायला हवं.”

बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी

यावेळी बच्चू कडू यांनी बोगस बियाण्यांच्या मुद्द्यावरही सरकारने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. अशा कंपन्यांच्या मालकांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी, कारण एका हंगामाचे नुकसान म्हणजे शेतकऱ्याच्या वर्षभराच्या उत्पन्नावर परिणाम होतो, असे ते म्हणाले.

Maharashtra politics : 2029 पूर्वी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार? मुख्यमंत्र्यांबाबत बड्या नेत्याचं विधान, राजकीय चर्चांना उधाण

Web Title: Bacchu kadu on devendra fadnavis delhi eknath shinde chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • Bacchu Kadu
  • CM Devendra Fadnavis
  • Cm Eknath Shinde
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात
1

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!
2

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!

CM Devendra Fadnavis : सिंहस्थ कुंभमेळ्याआधी नाशिकमध्ये मोठी तयारी! फडणवीसांनी घेतला विकासकामांचा आढावा
3

CM Devendra Fadnavis : सिंहस्थ कुंभमेळ्याआधी नाशिकमध्ये मोठी तयारी! फडणवीसांनी घेतला विकासकामांचा आढावा

Mangal Prabhat Lodha: तरुणांनो, कल्पनांना द्या नवी झेप! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा
4

Mangal Prabhat Lodha: तरुणांनो, कल्पनांना द्या नवी झेप! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.