Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वे उपनगरीय गाड्यात अधिकृत, फेरीवाल्यांना परवानगी देण्यास मनसेचा विरोध, मनसे आमदार राजू पाटील यांचा इशारा

  • By Rahul Gupta
Updated On: Dec 20, 2023 | 03:45 PM
रेल्वे उपनगरीय गाड्यात अधिकृत, फेरीवाल्यांना परवानगी देण्यास मनसेचा विरोध, मनसे आमदार राजू पाटील यांचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण (अमजद खान) :  रेल्वे प्रशासनाकडून उपनगरीय गाड्यात अधिकृत फेरीवाल्यांना व्यावसाय करण्याची परवानगी दिली जाण्याच्या हालचाली सुरु आहेत. रेल्वेच्या गाड्या कमी आहेत. प्रवाशांना सकाळ संध्याकाळ धक्के खात लोंबकळत प्रवास करावा लागतो. गाडीत प्रवाशांना पाय ठेवण्यासाठी जागा नसते. अशात अधिकृत फेरीवाल्यांना परवानगी देणे म्हणजे प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे. रेल्वेने असा काही निर्णय घेण्याचा विचार देखील करु नये अन्यथा मनसे रेल्वे प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.

रेल्वे स्टेशन परिसराच्या हद्दीतील फेरीवाले हटविण्याची मागणी मनसेच्या वतीने वारंवार केली जाते. ठिकठिकाणी रेल्वे हद्दीतील रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाले हटविण्याकरीता मनसे आंदोलनेही केली आहेत. मात्र रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाले हटविण्याच्या कारवाईबाबत रेल्वे आणि स्थानिक स्वराज्य संस्था एकमेकांवर जबाबदारी ढकलून मोकळे होते. या फेरीवाल्यांना पोसण्यात रेल्वे आणि महापालिकेचे अधिकारी हप्ते घेतात. या हप्तेखोरीवरच फेरीवाला पोसला जात आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अद्याप ठोस पावले उचलली जात नाहीत. स्टेशनमध्ये उतरलेला प्रवासी धड स्टेशनातून बाहेर पडू शकत नाही. अशा परिस्थिती रेल्वेकडून अधिकृत फेरीवाल्यांना उपनगरीय गाड्यात व्यावसाय करण्याची परवानगी देणे म्हणजे प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम रेल्वे कडून केले जाणार आहे. गर्दीत प्रवास करणे प्रवाशांना शक्य होत नाही. त्यात फेरीवाल्यांना परवानगी दिल्यावर सगळेच आलबेल होईल. अधिकृत आणि अनधिकृत फेरीवाला हे कोण ठरविणार. त्यापेक्षा अधिकृत फेरीवाल्यालाही परवानगी नको असे मनसेचे म्हणणे आहे. रेल्वेने मनसेची मागणी विचारात न घेता प्रवाशांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे आमदार पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.

उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संंस्था या प्रवासी संघटनेच्या वतीने अधिकृत फेरीवाल्यांना रेल्वे उपनगरीय गाड्यात व्यावसायाकरीता परवानगी देण्यास विरोध केला आहे. प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी लता अरगडे यांनी सांगितले की, आमचा विरोध आहे. रेल्वे प्रशासनाने परवानगी देणे हे प्रवाशांसह रेल्वे प्रशासनाला त्रासदायक ठरणार आहे. असा कोणताही निर्णय रेल्वेने घेऊ नये. प्रवाशांवर अशी वेळ आणू नका की प्रवाशांना आंदोलन करावे लागेल.

प्रवासी संघटनेचे पदाधिकारी राजेश घनघाव यांनी सांगितले की, रेल्वे असा काही निर्णय घेणार असेल तर तो अत्यंत चुकीचा आहे. त्याला सर्व प्रवासी संघटनांचा विरोध राहणार आहे. वेळ प्रसंगी प्रवासी रेल्वेच्या आंदोलन करतील, हे प्रशासनाने लक्षात ठेवावे .

Web Title: Mns opposes allowing hawkers in railway suburban trains warns mns mla raju patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2023 | 03:45 PM

Topics:  

  • kalyan
  • MLA Raju Patil

संबंधित बातम्या

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड
1

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪
2

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

KDMC News : नाल्याच्या उघड्या झाकण्यामुळे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; हा अपघात नाही, तर ही हत्या आहे मनसे नेते राजू पाटील यांचा आरोप
3

KDMC News : नाल्याच्या उघड्या झाकण्यामुळे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; हा अपघात नाही, तर ही हत्या आहे मनसे नेते राजू पाटील यांचा आरोप

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश
4

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.