Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण

राज ठाकरे यांना याअगोदरही २३ ऑक्टोबर २०२१ रोजी कोरोनाची लागण झाली होती. पहिल्यांदा राज यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाली.

  • By Ganesh Mate
Updated On: Jun 01, 2022 | 12:09 PM
raj thackeray

raj thackeray

Follow Us
Follow Us:

मुंबई : पायाच्या शस्त्रक्रियेसाठी लीलावती रुग्णालयात दाखल झालेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj thackeray) यांना कोरोनाची लागण (Covid Positive) झाल्याची माहिती आहे. शस्त्रक्रियेपूर्वी कराव्या लागणाऱ्या तपासण्यांतून त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पायावरची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. १ जून रोजी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार होती.

राज ठाकरे यांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून पक्षातील नेत्यांच्या बैठका घेतल्या होत्या. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नेत्यांशी चर्चा करून त्यांना सूचना केल्या होत्या. तसेच, वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधितही केले होते. त्यानंतर ते लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले. तत्पूर्वी तपासण्यांतून त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या पायाच्या जुन्या व्याधीने डोके वर काढले होते. राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, पायाचे दुखणे बळावल्याने त्यांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. त्यानंतर राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार असल्याचे निश्चित झाले होते. आज बुधवारी ही शस्त्रक्रिया होणार होती. मात्र, आता कोरोनातून सावरल्यानंतर शस्त्रक्रिया करणार येईल, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

कोविड डेड सेलमुळे ॲनेस्तेशिया देऊ शकत नाही
कोविड डेड सेलमुळे ॲनेस्तेशिया देऊ शकत नसल्यामुळे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी दिली.

राज ठाकरे यांना याअगोदरही कोरोनाची बाधा
राज ठाकरे यांना याअगोदरही २३ ऑक्टोबर २०२१ रोजी कोरोनाची लागण झाली होती. पहिल्यांदा राज यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर राज यांच्या भगिनीला कोरोनाने ग्रासले आणि नंतर स्वत: राज ठाकरे यांनादेखील कोरोनाने गाठले. सौम्य लक्षणे असल्याने राज यांनी त्यावेळी घरीच उपचार घेतले होते.

Web Title: Mns president raj infected with corona

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2022 | 09:52 AM

Topics:  

  • Corona Positive
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?
1

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?

Thackeray Brothers Morcha: हुकूमशाहाचा पहिला पराभव महाराष्ट्रातून; ठाकरे बंधूंची  ज्ञानेश कुमारांच्या हकालपट्टीची मागणी
2

Thackeray Brothers Morcha: हुकूमशाहाचा पहिला पराभव महाराष्ट्रातून; ठाकरे बंधूंची ज्ञानेश कुमारांच्या हकालपट्टीची मागणी

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल
3

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल

Uddhav Thackeray : ‘उद्या रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल,’ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा, गर्जना मोर्चातून घणाघात
4

Uddhav Thackeray : ‘उद्या रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल,’ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा, गर्जना मोर्चातून घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.